इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

● २० बटुंवर होणार सामुदायिक उपनयन संस्कार

 मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मे रोजी परळीत ब्राह्मण सभेचा ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा !

प. पु. मकरंद महाराज, भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांच्यासह संत व विद्वतजणांची लाभणार उपस्थिती


परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...

  परळी वैजनाथ येथे २ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा होणार असुन या सोहळ्यात २० बटुंवर वेदोक्त पद्धतीने सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प. पु. मकरंद महाराज, भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांच्यासह संत व विद्वतजणांची आशिर्वचनपर उपस्थिती तसेच मंत्री पंकजाताई मुंडे,आ.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

        ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ आयोजित ४५ वा उपनयन सोहळा मिती वैशाख शु. ५ शके १९४७ शुक्रवार दि. २ मे २०२५ वेळ : सकाळी १०.३१ वा. प्रवचनमंडप, वैद्यनाथ मंदीर जवळ, परळी वैजनाथ येथे शानदार आयोजनाने पार पडणार आहे.या सोहळ्यात परभणीचे पिठाधिपती प. पु. मकरंद महाराज,प्रसिद्ध भागवताचार्य व किर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर  यांचे शुभाशिर्वाद लाभणार असुन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन

मंत्री  पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या २०  बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. 

        तरी या शुभसोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन ब्राह्मण बहुउद्देशीय सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

● २०  बटुंवर होणार सामुदायिक उपनयन संस्कार

 

१.सर्वेश निलेश जयराम परळी वैजनाथ

२.श्रीयश राजाभाऊ खिस्ते परळी वैजनाथ

३.समर्थ सचिन तेरकर परळी वैजनाथ

४.सर्वेश प्रशांत तुळशी परळी वैजनाथ 

५.अश्विन जतीन देशपांडे परळी वैजनाथ

६.साईदीप सचिन कुलकर्णी सिरसाळा

७.अथर्व अनंतराव वकील लातूर

८.निलेश विपिन देशपांडे छ. संभाजीनगर

९.कृष्णा भगवान कुलकर्णी सोनपेठ

१०.मयूर रंगनाथ कुलकर्णी सोनपेठ

११.गोपाळ प्रशांत क्षीरसागर जिंतूर

१२.कृष्णा प्रशांत क्षीरसागर जिंतूर

१३.चैतन्य उमाकांत जोशी नांदेड

१४.कुणाल उमाकांत जोशी नांदेड

१५.निरज नंदेश घोन्सीकर ताडकळस

 १६.निखिल नंदेश घोन्सीकर ताडकळस

 १७.मंगेश महेश कुलकर्णी सिंधगाव 

१८.तन्मय महेश कुलकर्णी सिंधगाव 

१९.अथर्व सदानंद जोशी उदगीर

२० प्रथमेश मुदगलराव कुलकर्णी मुदगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....