इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

श्री चिंतेश्वर विद्यालयात मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे उद्घाटन

गेवराई: (प्रतिनिधी) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात *मुक्तछंद उन्हाळी शिबीराचे* उद्घाटन आज श्री अनिल बोर्डे यांच्या हस्ते संपन्न झाले.प्रसंगी व्यासपीठावर स्थानिक समन्वय समिती कार्यवाह श्री दत्तात्रय पत्की,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री अक्षय कुलकर्णी शिशुवाटिका प्रमुख श्रीम.धनश्री ताई पत्की प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी माध्यमिक मुख्याध्यापक श्री अमोल गोरकर शिबिर प्रमुख श्रीम.राधा माने यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमासोबत सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने श्री चिंतेश्वर विद्यालय गेवराई येथे दिनांक 2 मे 6 मे या कालावधीमध्ये मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये सूर्यनमस्कार, योगा,ध्यान,स्व-संरक्षण, मेहंदी,रांगोळी, आर्ट अँड क्रॉफ्ट नृत्य,पपेट शो,दिर्घकथा,श्रीमद् भगवत गीता १५ वा अध्याय पाठांतर,झुंबा डान्स इ.विविध कौशल्यपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी या उद्देशाने सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मुक्तछंद शिबिराच्या आजच्या प्रथम दिनी शिबिरास भा.शि.प्र.संस्था कार्यवाह डॉ.श्री.हेमंत वैद्य,अर्थ समिती अध्यक्ष श्री नितीन डोळे,सुदर्शन गुळजकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....