पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी आकाश कुकर,उपाध्यक्ष वैजनाथ लांडे तर सचिव पदी मुंजा सरवदे यांची निवड


परळी प्रतिनिधी /

     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नुकतीच बैठक संपन्न झाली. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कुकर यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी मुंजा सरवदे तर उपाध्यक्षपदी वैजनाथ लांडे, सहसचिव तुषार नाईकवाडे, कॅशियर नितीन सरवदे, आकाश सरवदे यांची निवड करण्यात आली.


31मे रोजी सकाळी 10 वाजता होळकर चौक येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे तसेच भव्य मोटरसायकल रॅली प्रभू वैद्यनाथ मंदिर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी निघणार आहे .


त्यानंतर महाप्रसादाचे अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी आयोजन केले आहे. तर सायंकाळी 6 वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक होळकर चौक ते राणी लक्ष्मीबाई टावर चौक काढण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे तरीही या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आव्हान केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !