इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

परळी वैजनाथ ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल!

मजूराच्या १५ वर्षीय मुलीचे अपहरण

परळी वैजनाथ: प्रतिनिधी..
     तालुक्यातील पांगरी ता. परळी वै येथे राहणाऱ्या एका मजुराच्या १५ वर्षीय मुलीचे अपहरण  झाल्याप्रकरणी परळी वैजनाथ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,कैलास वैजनाथ आरगडे रा. ताडपांगरी ता. जि. परभणी  ह.मु. पांगरी ता. परळी वै. येथे मजूर म्हणून काम करतात. त्यांची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे.तीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन घेऊन गेला आहे अशा प्रकारची फिर्याद देण्यात आली. या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन- 219/2025 कलम 137 (2), BNS प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या