इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 शिवा संघटनेच्या भजनगायन स्पर्धेत शंभु महादेव भजनी मंडळ प्रथम



महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त घेण्यात आल्या भजनी मंडळाच्या गायन स्पर्धा

परळी (प्रतिनिधी)

  महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने दि.४ मे रोजी भजनी मंडळ गायन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक परळीच्या शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळाने पटकावले.विजेत्या महिला भजनी मंडळांना समाजबांधवांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.

  शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने दरवर्षी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त विविध समजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी जयंती दिनी महात्मा बसवेश्वर प्रतिमा पूजन,महात्मा बसवेश्वर चौक सुशोभीकरण हे कार्यक्रम घेतल्यानंतर रविवार दि.४ मे रोजी संत गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे भजनी मंडळ स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये प्रथम पारितोषिक शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळ,द्वितीय पारितोषिक वैजनाथ भजनी मंडळ तर तृतीय पारितोषिक हरिहर भजनी मंडळाने मिळवले. विजेत्यांना रोख रक्कम,स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व शिवा संघटनेचा मानाचा रुमाल देऊन माजी आमदार संजय दौंड,भाजपा शहराध्यक्षा सौ.उमाताई समशेट्टे,दत्ताप्पा ईटके,डॉ.सुरेश चौधरी,सुर्यभान मुंडे,रमेश चौंडे,आदींच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.पञकार मोहन व्हावळे,धनंजय आढाव,महादेव शिंदे,अश्विन मोगरकर,नितीन समशेट्टे,माजी सभापती गोपाळ आंधळे,श्रीराम लांडगे आदींनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी च्या शहराध्यक्ष पदी सौ.उमाताई समशेट्टे व हनुमान व्यायाम शाळेच्या अध्यक्षपदी वैजनाथ ईटके यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून भरत महाराज सोडगिर व कृष्णाजी बळवंत यांनी परीक्षण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल अष्टेकर यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष गणेश वारकरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर कोरे,दर्शन सपाटे,लहु हालगे, निलेश राजनाळे,अनिकेत तिळकरी, मधुकर व्यवहारे,योगेश गोपनपाळे, संदिप बावगे,सोमनाथ खोत,संकेत खके आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या