इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

कंत्राटदाराची हलगर्जी भोवली- परळीकरांनी आठ दिवस निर्जळी !

भोंगळ कारभार थांबवा; पाईपलाईन फुटीसारखे प्रकार थांबवून पाणीपुरवठा सुरळीत करावा -अश्विन मोगरकर

परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

       महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे परळी शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने गणेशपार सह गावभागात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वारंवार होणाऱ्या पाईपलाईन फुटीच्या घटना त्वरित थांबवून किमान उन्हाळ्यात तरी पाणीपुरवठा सुरळीत रहावा व पाईपलाईन फोडणार्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाजपा पदाधिकारी अश्विन मोगरकर यांनी मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांच्याकडे केली आहे.

         परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाण धरणात मुबलक पाणीसाठा असूनही नियोजना अभावी व वारंवार होणाऱ्या पाईपलाईन फुटीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. थर्मल कॉलनी जवळील रस्ते महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणी हलगर्जीपणामुळे परळी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने आठ दिवसांपासून गावभागाला पाणीपुरवठा बंद आहे. यापूर्वीही अनेकवेळा विविध ठिकाणी पाईपलाईन फुटल्याच्या घटना घडल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याबाबतीत अश्विन मोगरकर यांनी प्रशासनाकडे तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. 

Click:-● *नवा ट्विस्ट; दोन दिवसांपूर्वी परळीत एकाला उचलले; अपहरणाचा गुन्हाही दाखल मात्र खरच अपहरण की अन्य काही कारण ?*

      मुख्याधिकारी यांनी त्वरित दखल घेत ईटके कॉर्नर येथे पाईपलाईन दुरुस्ती ठिकाणी येऊन कामाची पहाणी करून त्वरित दुरुस्ती संदर्भात आदेश दिले. पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करून गावभागात पाणी येईल असे पाणीपुरवठा अभियंता साळवे यांनी सांगितले. वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी भाजपा पदाधिकारी अश्विन मोगरकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या