इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

Congratulations!!!!

 १० वी परिक्षेत ९०.००% गुण; चि.अश्विन अनिल मस्के याचे घवघवीत यश



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत चि. अश्विन अनिल मस्के याने 89.60% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


     परळी वैजनाथ येथील अभिनव विद्यालयातून चि. अश्विन अनिल मस्के याने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत त्याने 89.60% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय परिवारजन आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट