प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

Congratulations!!!!

बिलाल शाळेची निकालाची गौरवशाली परंपरा कायम: उर्दू माध्यमात तालूक्यातून प्रथम

 परळी वैजनाथ: दिनांक 13 मे 2025 रोजी माध्यामिक शालांत प्रमाणपत्र या परिक्षेचा निकाल लागला त्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले यामध्ये कुमारी अर्शिया सुलतान अली शेख या विध्यार्थीनिने 93.20% घेऊन तालूक्यात उर्दू माध्यमातून प्रथम येण्याचा मान पटकावला त्याच बरोबर निदाखान शेर खान 92.40 % घेऊन द्वितिय येण्याचा मान मिळवला शाळेतील विद्यार्थ्यांनी खूपच चांगले गुण मिळवून शाळेचे नाव लौकिक केले त्यामध्ये मारिया कुलसुम शहेबाज खान 86.60% घेऊन शाळेतून तिसरा क्रमांक मिळवाला त्याच बरोबर शेख अयमन रिदा मुदस्सर नदीम 83.00 % घेऊन शाळेतून चौथा क्रमांक पटकावला त्याच बरोबर अलफिया माहिन अखिल शेख 77.40% घेऊन शाळेतून पाचवा क्रमांक मिळवला. यासर्व  विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष शेख अब्दुल करीम साहेब, सचिव शेख तस्नीम फातेमा बाजी, कोषाध्यक्ष शेख मुदस्सर नदीम, शाळेचे मुख्याध्यापक शेख सुलतानअली व शाळेचे सर्व कर्मचारी यांनी विदयार्थ्यांचे मन:पुर्वक अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या