कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

५ वर्षापासून रखडलेल्या परळी-मरळवाडी-मांडवा (परळी) रस्त्यांची व पुलांची कामे कधी होणार?- मांडवा, मरळवाडी ग्रामस्थांचा सवाल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
      ५ वर्षापासून रखडलेल्या परळी-मरळवाडी-मांडवा (परळी) रस्त्याची व पुलांची कामे कधी होणार? असा संतप्त सवाल मांडवा, मरळवाडी येथील काही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
      याबाबत उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग परळी वैजनाथ यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षापासून आजपर्यंत परळी-मरळवाडी-मांडवा (परळी) रस्त्याची कामे तसेच भगवती, बोरणानदीवरील पुलावरील कामे काहीही झालेली नाहीत. तसेच ३१ मार्च २०२५ पर्यंत परळी-मरळवाडी-मांडवा (परळी) रोड अपुर्ण काम ठेवलेले आहे.अद्याप ही कामे सुरू केलेली नाहीत. ही कामे कधी सुरू होणार ? अशी निवेदनीद्वारे विचारणा करण्यात आली आहे. निवेदनावर  प्रभाकर पिराजी फड (माजी सभापती) मांडवा, सटवाजी किसन फड (माजी पं. स. सदस्य) मांडवा, प्रभू राम आंधळे (चेअरमन) मरळवाडी, संदीपान रामकिशन आंधळे (माजी सरपंच) मरळवाडी,लक्ष्मण दौलता फड मांडवा,ज्ञानोबा संभाजी आंधळे मरळवाडी,ब्रह्मदेव ज्ञानोबा दराडे मांडवा,आरुण लक्ष्मण फड - (उपसरपंच मांडवा),रावण भानुदास गुट्टे(माजी सरपंच) मांडवा आदींची नावे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या