युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

इतिहासात प्रथमच परळीत देशपातळीवरील पशुप्रदर्शन.....!

ऐतिहासिक बहुमान: परळीत होणार “महापशुधन एक्स्पो २०२५”




ना. पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून डिसेंबरमध्ये परळीत होणार देशपातळीवरील भव्य पशुप्रदर्शन ; पावणे सहा कोटीचा निधी मंजूर

मुंबई ।दिनांक २९।

राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकारातून परळीला देश पातळीवरील मोठा बहुमान मिळाला आहे. परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच अनोखे व आगळे वेगळे असे देश पातळीवरील भव्य पशुपक्षी प्रदर्शन भरणार आहे. देशपातळीवरील महापशुधन एक्स्पो हा परळीसाठी ऐतिहासिक बहुमान ठरणारा आहे. राज्यातील पशुपालकांसाठी आणि कृषी क्षेत्राशी निगडित पशुसंवर्धन उद्योगांसाठी एक मोठी उपलब्धी  म्हणून परळी वैजनाथ येथे १० ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान “महापशुधन एक्स्पो २०२५” हे  देशपातळीवरील पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या प्रदर्शनासाठी शासनाने ५ कोटी ८४ लाख रूपये मंजूर केले असून याबाबतचा शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे.

         भारतीय पशुधन क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे असून भारतात ११.६ टक्के पशुधन आहे. पशुपालन हा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. महाराष्ट्रात पशुपालनातून शेतकऱ्यांना हमीपात्र उत्पन्न मिळत असून, ज्या भागात हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो, त्या भागात आत्महत्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे आढळून आले आहे.राज्याच्या विकासात विदर्भ व मराठवाडा या भागांचा सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाटा कमी असल्याने तेथील शेतकऱ्यांना व पशुपालकांना प्रोत्साहन देणे अत्यावश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून परळीत अखिल भारतीय पशुप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे अखिल भारतीय पशुप्रदर्शन पशुपालकांना नवीन तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता व प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी प्रेरणा देणार आहे.

    या प्रदर्शनात राज्यातील आणि राज्याबाहेरील देशभरातून विविध जातींचे जातीवंत व उत्कृष्ट पशुधन प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच पशुसंवर्धन क्षेत्रातील व्यावसायिक, तज्ज्ञ आणि विविध संस्थांचे स्टॉल्स लावले जाणार असून अद्ययावत तंत्रज्ञान, उपकरणे आणि नव्या संधींची माहिती पशुपालकांना मिळणार आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. परळी वैजनाथ येथे होणारा हा “महापशुधन एक्स्पो २०२५” राज्यातील पशुपालक, उद्योग, संशोधक आणि सामान्य नागरिकांसाठी एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या