धार्मिक सोहळा:लाभ घेण्याचे आवाहन

 गोपाष्टमी निमित्त रामरक्षा गौशाळेत आयोजित दुर्गा सप्तशती शतचंडी व येष्टी महायज्ञ सोहळ्याची आज सांगता



परळी वैजनाथ, प्रतिनिधी,.....
       रामरक्षा प्रतिष्ठान संचलित  रामरक्षा गौशाळा यांच्या वतीने कार्तिक शुक्ल गोपाष्टमी (गौ-पाटा) निमित्त शनिवार, दि. २५ ऑक्टोबर २०२५ ते गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.या उत्सवांतर्गत सामुदायिक गौ पूजन, वारकरी हरी कीर्तन तसेच दुर्गा सप्तशती शतचंडी व येष्टी महायज्ञ सोहळ्याची आज सांगता होणार आहे.
        यज्ञाचार्य बहुसोमयाजी यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज (गंगाखेड) यांच्या सान्निध्यात शतचंडी यज्ञ पार पडणार असून आज गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ह.भ.प. आत्मारामजी महाराज कुटे शास्त्री (जोगमहाराज संस्था, आळंदी) यांचे हरिकीर्तन होणार आहे.किर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामरक्षा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!