मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

जम्बो कार्यकारणी जाहीर...... हार्दिक अभिनंदन!!!!!

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न परळी पत्रकार परिषदेची जम्बो कार्यकारणी जाहीर :तालुकाध्यक्ष धीरज जंगले, शहराध्यक्ष किरण धोंड



तालुका कार्याध्यक्ष आत्मलिंग शेटे, तर तालुका सचिवपदी दिगंबर देशमुख, शहर सचिवपदी माणिक कोकाटे, तालुका सहकोषाध्यक्षपदी गणेश आदोडे, तालुका उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड, तालुका कोषाध्यक्षपदी संदीप मस्के, शहर कार्याध्यक्षपदी अनंत कुलकर्णी, शहर उपाध्यक्षपदी अभिमान मस्के आदींची निवड 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच विभागीय संघटक सुभाष चौरे, विभागीय सचिव रवी उबाळे, बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे, गजानन मुडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुक्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात सर्वानुमते परळी तालुका अध्यक्षपदी धीरज जंगले, शहराध्यक्षपदी किरण धोंड, तालुका कार्याध्यक्षपदी आत्मलिंग शेटे तर सचिवपदी दिगंबर देशमुख यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या वतीने दि.6 जानेवारी 2026 रोजी दर्पण दिन परळी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

परळी शहर तालुक्यातील पत्रकारांची बैठक ज्येष्ठ पत्रकार परळी प्रहार चे मुख्य संपादक राजेशजी साबणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न परळी पत्रकार संघाची कार्यकारणी निवडण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत सर्वानुमते कार्यकारणी निवडण्यात आली आहे. 

परळी तालुका अध्यक्षपदी धीरज जंगले (दैनिक चंपावतीपत्र, तालुका प्रतिनिधी), शहराध्यक्ष किरण धोंड, (दैनिक प्रजापत्र), तालुका कार्याध्यक्षपदी आत्मलिंग शेटे (मुख्य संपादक परळी समाचार), तालुका उपाध्यक्ष अनिल गायकवाड (दैनिक मराठवाडा साथी), तालुका सचिवपदी दिगंबर देशमुख (दैनिक सकाळ सिरसाळा प्रतिनिधी), तालुका कोषाध्यक्षपदी संदीप मस्के (दैनिक देवगिरी वृत्त) तालुका सहकोषाध्यक्ष गणेश आदोडे (दैनिक बीड सरकार), परळी शहर उपाध्यक्ष अभिमान मस्के (मुख्य संपादक दैनिक उपेक्षितांचा आधार), शहर सचिवपदी माणिक कोकाटे (दैनिक किसान), शहर कोषाध्यक्षपदी संतोष बारटक्के (दैनिक लोकप्रश्न), परळी शहर कार्याध्यक्ष अनंत कुलकर्णी (मुख्य संपादक परळी संचार), प्रसिद्धी प्रमुखपदी: अभिमन्यू फड (दैनिक लोकपत्र), गोपाल सोनी (संपादक दैनिक न्याय टाइम्स), निवृत्ती खटिंग (संपादक साप्ताहिक शेतकरी परिसंवाद), कुंडलिक लहाने (दैनिक पुण्यनगरी सिरसाळा), कैलास डुमणे (संपादक रणधुमाळी), पृथ्वीराज मस्के (दै.उपेक्षितांचा आधार), मार्गदर्शक व सल्लागारपदी राजेश साबणे (मुख्यसंपादक दैनिक परळी प्रहार), प्रकाश सूर्यकर (मुख्य संपादक दैनिक दिव्यअग्नि), रामप्रसाद शर्मा (दैनिक पार्श्वभूमी परळी तालुका प्रतिनिधी), प्रा.राजू कोकलगावे (दैनिक लोकमत टाइम्स परळी तालुका प्रतिनिधी), प्रा.प्रवीण फुटके (दैनिक सकाळ परळी तालुका प्रतिनिधी), जगदीश शिंदे (दैनिक गावकरी, बीड संकेत परळी तालुका प्रतिनिधी), बालकिशन सोनी (मुख्य संपादक दैनिक न्याय टाइम्स), सुरज बियाणी (संपादक मराठवाडा साथी) तर कार्यकारणी सदस्यपदी:- विजय रोडे (उपसंपादक दैनिक लोकनेता), संजय क्षीरसागर (दैनिक मराठवाडा साथी), रमेश लहाने (दैनिक झुंजार नेता सिरसाळा), अनिल देशमुख (दैनिक दिव्य मराठी सिरसाळा), दत्ता शिवगण (सा.परळी नगरी), नरसिंग अन्नदास (दैनिक अंबाजोगाई वार्ता), कैलास बजाज (दै. मराठवाडा साथी), विश्वजीत मस्के, बालासाहेब लोभे (दै.रयतेचा आधार) आदींची निवड करण्यात आली आहे.

---------------------

दर्पण दिन व मूकनायक दिन कार्यक्रमाचे आयोजन

---------------------

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न परळी पत्रकार संघाच्या वतीने दि.6 जानेवारी 2026 रोजी दर्पण दिन व 31 जानेवारी 2026 रोजी मूकनायक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रिंटमीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....