भरदिवसा घरफोडी : ऊसतोड मजुराच्या घरातील सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास 





केज :- केज तालुक्यातील काशिदवाडी येथे ऊसतोड मजुराचे भरदिवसा घर फोडून घरातील कपाटात ठेवलेले १ लाख ९३ हजार ९०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व नगदी ३० हजार रुपये असा २ लाख २३ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. 

काशीदवाडी ता. केज येथील ऊसतोड मजूर सुनील साहेबराव जाधवर हे त्यांची पत्नी, भाऊ, भावजयीसह सोलापूर येथे सिद्धनाथ साखर कारखान्यास ऊस तोडणीसाठी मागील दोन महिन्यां पूर्वी गेले आहेत. गावी त्यांचे आई - वडील आणि वृद्ध आजी आहेत. २२ डिसेंबर रोजी दुपारी त्यांचे आई - वडील जनावरांना चारण्यासाठी घेऊन शेतात गेले होते. घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन्ही कपाट तोडून कपाटात ठेवलेले १ लाख ९३ हजार ९०० रुपये किंमतीचे ९ ग्रॅमचे दोन मणी मंगळसूत्र, १२.५ ग्रॅमचे दोन मणी गंठण, १२.५ ग्रॅमचे दोन झुंबर जोड, ६.५ ग्रॅमचे सेवनपीस, ३ ग्रॅमच्या कानातील सोन्याच्या काड्या व नगदी ३० हजार रुपयांची रक्कम असा एकूण २ लाख २३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. २४ डिसेंबर रोजी सुनील काशीद यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु र नं ७०२/२०२५ भा न्या सं ३०५(अ), ३३२(३) नुसते गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!