भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन....

 नागापूर येथे 31 डिसेंबरपासुन  नागनाथ महाराजांची यात्रा

परळी (प्रतिनिधी) तालुक्यातील नागापूर येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची वार्षिक भव्य यात्रा ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान होत आहे. 

          ३१ रोजी रात्री नागनाथ मंदिरात किशोर महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन होईल. १ जानेवारी रोजी सकाळी वरपगाव येथील भगवान महाराज मोरे यांचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. याच दिवशी रात्री १२ वाजता श्रीनागनाथ महाराजांची पालखी मिरवणूक निघणार आहे. २ रोजी सकाळी पालखीची आरती व दुपारी जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन नागनाथ देवस्थानचे सचिव कुंडलिकराव सोळंके, अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ तसेच विश्वस्त अर्जुन सोळंके, हनुमंत कुलकर्णी, प्रभाकर आप्पा तोंडरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार