इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

हार्दिक शुभेच्छा!!!!

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या परळी तालुकाध्यक्ष पदी प्रल्हाद कंडूकटले तर शहराध्यक्षपदी रंगनाथ सावजी यांची एकमताने निवड




कार्याध्यक्षपदी सुमित गिरी, उपाध्यक्षपदी अरुण सपाटे तर सचिवपदी मोहन चव्हाण 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या बीड जिल्हा शाखे अंतर्गत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या परळी तालुकाध्यक्षपदी प्रल्हाद कंडुकटले यांची तर शहराध्यक्षपदी रंगनाथ सावजी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पत्रकार संघाची आज शासकीय विश्राम गृह येथे दैनिक दिव्यअग्निचे मुख्यसंपादक तथा जेष्ठ मार्गदर्शक प्रकाशजी सुर्यकर यांच्या अध्यक्षतेखाली व दैनिक महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत नुतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. ती पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले (दैनिक हिंद जागृती), कार्याध्यक्ष सुमित गिरी (दैनिक बीडसत्ता), उपाध्यक्ष अरूण सपाटे (परळीचा आवाज), सचिव मोहन चव्हाण (दै.युवा मराठा) सदस्य समीर ईनामदार (दै.युवाशक्ती), संतोष बारटक्के अंबजोगाई टाईम्स, विद्याधर सिरसाट परळी वार्ता, अनिरूध्द जोशी मुक्त पत्रकार, धनंजय माने मुक्त पत्रकार, प्रकश वर्मा दै.लोकतंज्ञ, नितीन जाधव (बीड नगरी), आकाश सोनी (न्याय टाईम्स), पवन माने (जनशक्ती) शिवराम जाधव (विश्वनायक), अनंत हडबे (मराठवाडा साथी), दत्ता शिवगण (परळी नगरी), तर सल्लागार जी.एस.सोंदळे (वैद्यनाथ टाईम्स), बाबुराव दहिभाते (महाराष्ट्र प्रतिमा), बालासाहेब कडबाने दैनिक जगमित्र, राजेश साबणे (दैनिक परळी प्रहार), भगीरथ बद्दर (पोलखोल), शिरिष सोलपुरे (त्रिशुल), बालासाहेब जगतकर (मानपत्र), हनुमान मगर (क्रांतीकारी साथी), राजकुमार कदम (मराठवाडा नेता) आदींची निवड करण्यात आली आहे. लवकर परळी शहरातील भव्य दिव्य दर्पण दिन साजरा करण्यात येईल अशी माहिती कंडुकटले व सावजी यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या