#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

हळदी कुंकू कार्यक्रमालाही... नव्या युगाची जोड

 ज्ञानदा ग्रुपचा आकर्षक व लक्षवेधी उपक्रम: मकरसंक्रांत हळदीकुंकू समारंभात 'विश्वविजेता महिलांचा गौरव' !



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       मकरसंक्रांती निमित्त दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावा सादर करणाऱ्या परळीतील ज्ञानदा ग्रुपचा यावर्षीचा देखावा हा अतिशय आकर्षक व लक्षवेधी उपक्रम ठरला.

        ज्ञानदा ग्रुपने सादर केलेला मकरसंक्रांत हळदीकुंकू समारंभातील अत्यंत दर्जेदार व आकर्षक देखाव्याने परळी शहरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.हा देखावा बघण्यासाठी व हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.परळीतील  ज्ञानदा ग्रुपच्या वतीने दरवर्षीच आकर्षक पद्धतीने महिलांचा अभिमान, स्वाभिमान व अस्मितेच्या संबंधाने प्रेरक अशा प्रकारच्या विषयाच्या अनुषंगाने आकर्षक पद्धतीने देखावा सादर केला जातो. यावर्षी  विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा गौरव करणारा देखावा चित्रित करण्यात आला. आकर्षक मांडणी व सुरेख सादरीकरणातून सकारलेल्या या थिममधून चॅम्पियन्स ठरलेल्या महिलांचा एक प्रकारे गौरव मकरसंक्रांती हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून  करण्यात आला.हळदी कुंकू कार्यक्रमाला परळी शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तसेच यावर्षीच्या विषयाची थीम व आकर्षक मांडणीचे सर्वांनी कौतुक केले.यापुर्वी ज्ञानदा ग्रुपने 'घे भरारी- जर्नी ऑफ वुमेन सांयटिस्ट' या थिमवर आकर्षक देखावा सादर केला होता. इस्त्रो मोहिम, चांद्रयान आदी मोहिमांमध्ये सहभागी वैज्ञानिक महिलांचा यानिमित्ताने सन्मान करण्याच्या दृष्टीने हा देखावा सादर करण्यात आला होता. त्यापुर्वी ज्ञानदा ग्रुपच्या वतीने हुबेहुब भिडेवाडा साकारण्यात आला होता. अशा पद्धतीने दरवर्षी नवनवीन विषय घेऊन अतिशय दर्जेदार अशा पद्धतीने प्रेरणा देणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने हळदीकुंकू कार्यक्रमातून महिला अस्मितेची जपणूक करण्याचा उपक्रम ज्ञानदा ग्रुपने केलेला आहे. ज्ञानदा ग्रुपच्या सौ. रोहिणी सचिन जोशी,सौ.मोहिणी अजय जोशी,सौ. दर्शना अजय साखरे,सौ.मनोरमा स्वप्निल सावजी,सौ.अश्विनी निलेश ढवळे,सौ. ज्ञानेश्वरी जयराम गोंडे,सौ.अनिता संजय वानखेडे, सौ. वैभवी प्रशांत जोशी यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....