लाभ घेण्याचे आवाहन....

 संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी  जन्मोत्सव निमित्त परळीत  21 जानेवारी पासून तीन दिवसीय श्री परम रहस्य पारायण

 परळी :येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान, बेलवाडी (वैद्यनाथ मंदिराजवळ) येथे संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांचा जन्मोत्सव दि. 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजून 21 मिनिटांनी भक्तिभावात साजरा होणार आहे. या सोहळ्यास श्री गुरु 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (साखरखेडेकर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी जन्मोत्सवानिमित्त वीरशैव लिंगायत समाज, परळी यांच्या वतीने दि. 21, 22 व 23 जानेवारी 2026 रोजी तीन दिवसीय श्री परमरहस्य पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून परळीत या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जात असून, यंदा हे अकरावे वर्ष आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

🔹 दि. 21 जानेवारी 2026

सकाळी 8.00 ते 11.45

श्री परमरहस्य पारायण

यावेळी श्री वैद्यनाथ भजनी सेवाभावी संस्था, श्री शंभू महादेव भजनी मंडळ, श्री शिवकन्या भजनी मंडळ व श्री सुरवेश्वर भजनी मंडळ यांच्या वतीने भजनसेवा होणार आहे.

🔹 दि. 22 जानेवारी 2026

सकाळी 8.00 ते 11.45

श्री परमरहस्य पारायण

यानंतर श्री शंभू महादेव सेवाभावी संस्था भजनी मंडळ, श्री हरिहर भजनी मंडळ तसेच श्री संत मन्मथ स्वामी संगीत विद्यालय महिला भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे.

🔹 दि. 23 जानेवारी 2026

सकाळी 8.00 ते 11.00

श्री परमरहस्य पारायण

यानंतर गुरुवर्यांची पाद्यपूजा व आशीर्वचन

दुपारी 12.21 वाजता संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी जन्मोत्सव सोहळा

दुपारी 1.00 ते 5.00 महाप्रसाद

महाप्रसादाच्या वेळी श्री गुरुलिंग स्वामी भजनी मंडळ, गजानन भजनी मंडळ, शनैश्वर भजनी मंडळ व श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे.

वैद्यनाथ मंदिराजवळील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान येथे होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज, परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी जन्मोत्सव समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार