इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

संतोष फड यांना पितृशोक.....

 कन्हेरवाडी येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नाथराव फड यांचे निधन



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

       तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरंग फड यांचे आज दि.२१ जानेवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माजी व्हाईस चेअरमन नाथराव फड यांचे सकाळी ०८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यू समयी ६२ वर्षे होते. संतोष नाथराव फड व बबलू नाथराव फड यांचे वडिल होत. 

        परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरंग फड यांचे आज अल्पशा आजाराने बुधवार दि. २१ जानेवारी रोजी निधन झाले. कन्हेरवाडी येथे अनेक काळ सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य व अनेक पद ही त्यांनी भुषविले आहे. याकाळात गावात त्यांनी शैक्षणीक, सांस्कृतिक अनेक कामात त्यांचा सहभाग होता. 

         माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरंग फड हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने परळी वैजनाथ तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरंग फड यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

       माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरंग फड यांच्या पार्थिवावर कन्हेरवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या या अंतयात्रेत सर्व स्तरातील नागरिक, राजकीय, व्यापारी, पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस कर्मचारी व नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित होते. माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरंग फड यांच्यावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. 

राख सावडण्याचा कार्यक्रम 

       राख सावडण्याचा विधी शुक्रवार, दि.२३ रोजी सकाळी 7 वा. होणार आहे. कन्हेरवाडी येथे होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या