इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

मिलिंद विद्यालयात 'स्व.पंडितअण्णा मुंडे क्रीडा महोत्सवाची' सुरूवात 



परळी वै.(प्रतिनिधी): 

नाथ शिक्षण संस्था संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालय व मिलिंद ज्युनियर कॉलेज येथे 'स्व.पंडितअण्णा मुंडे क्रीडा महोत्सवाचे' उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक कदरकर बी.जी.,प्राचार्य व्ही.एन.शिंदे,पर्यवेक्षक राठोड बी.एस.,उप-प्राचार्य, इरफान शेख यांच्या हस्ते मिलिंद विद्यालयाच्या मैदानावर श्रीफळ वाढवून करण्यात आली. याप्रसंगी क्रिडा शिक्षक संजय शेप, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते. 

    या क्रिडामहोत्सवाअंतर्गत शाळेतील क्रिडाविभाग प्रमुख संजय शेप सर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध अंतरवर्गीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कबड्डी,खो-खो,क्रिकेट,हाॅलीबाॅल, धावने या सांघिक व वैयक्तिक मैदानी स्पर्धांचा समावेश आहे. तसेच निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा,सॅक रेस,दोरी उड्या, मुक्त चित्र स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा इत्यादी स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या