हार्दिक अभिनंदन.....!!!!

 नागापूर येथील सामान्य कुटुंबातील लेकीची एसबीआय बॅकेत सर्कल ऑफीसरपदी नियुक्ती 





परळी वैजनाथ दि.०५ (प्रतिनिधी)

         नागापूर येथील सामान्य कुटुंबातील लेक मोहिनी संगिता कानिफनाथ दावलबाजे हिची स्पर्धा परिक्षेतून एसबीआय बॅकेत सर्कल ऑफीसरपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्ती बदल तिचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तर परळी येथे तेली समाजाच्या वतीने मोहिनी व पालकांचा सत्कार करण्यात आला. 

           तालुक्यातील नागापूर येथील पोस्ट मास्तर असलेले कानिफनाथ दावलबाजे यांची कन्या मोहिनी दावलबाजे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत, उच्च शिक्षण बीई इलेक्ट्रॉनिक तर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बॅकिंग आणि फायनान्स हे मनिपाल विश्वविद्यालय बेंगलोर येथे झाले यानंतर पाच वर्षे आयसीआयसीआय बँक मुंबई येथे नौकरी केली. नौकरी करत असताना बॅकींग क्षेत्रातील परिक्षा देत नुकतीच एसबीआय बॅकेत सर्कल ऑफीसरपदी मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे. या यशाबद्दल तिचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे तर मोहिनीने सांगितले की, मला उच्च पदावर नौकरी करण्याचे माझे स्वप्न असल्याने आयसीआयसीआय बँकेत नोकरी असताना अभ्यास सुरू ठेवला व एसबीआय बॅकेत जागा निघाल्याने फाॅर्म भरला व परिक्षा दिली. नूकताच निकाल लागला असून एसबीआय बॅकेत सर्कल ऑफीसरपदी मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे. याबद्दल परळी येथे श्री शनी मंदिरात तेली समाजाच्या वतीने तिचा व पालकांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी श्री साखरे, छगन आप्पा क्षीरसागर, श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक चंद्रकांत उदगीरकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा सचिव प्रा मधुकर शिंदे, शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर जठार, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नांदेड विभाग कार्याध्यक्ष प्रा प्रविण फुटके, ईश्वर राउत, तेली युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष पवन फुटके, सोमनाथ वाघमारे आदि समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!