#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

परळीसाठी अभिमानास्पद...... हार्दिक अभिनंदन!!!!!

परळीसाठी अभिमानास्पद: युवा आणि क्रीडा विकास संघटना (भारत) आयोजित ओपन नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये परळीच्या समर्थ धोकटेने मिळवले सुवर्णपदक





परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

   युवा आणि क्रीडा विकास संघटना (भारत) यांच्यावतीने अमृतसर पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या ओपन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 मध्ये परळीच्या मुलाने भरीव कामगिरी केली असून राष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     युवा आणि क्रीडा विकास संघटना (भारत) यांच्या वतीने अमृतसर (पंजाब) येथे ३० व ३१ डिसेंबर २०२५ रोजी  ओपन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्रातून स्पर्धक म्हणून सहभागी स्पर्धक समर्थ मनोज धोकटे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत समर्थ धोकटे याने सुवर्णपदक पटकावत परळीचे नाव उंचावले आहे. परळी येथील व्यावसायिक मनोज धोकटे यांचा तो मुलगा असून कैलास विष्णुपंत धोकटे यांचा समर्थ हा पुतण्या आहे.

          या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत समर्थ मनोज धोकटे याने आपल्या कौशल्य, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....