इमेज
  महेश नवमी निमित्त आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ६१ जणांची आरोग्य तपासणी; ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान परळी वैजनाथ | प्रतिनिधी       महेश नवमी २०२६ निमित्त स्व. कौसल्याबाई गोविंदलालजी नावंदर यांच्या स्मरणार्थ परळी माहेश्वरी महिला संघटना आणि परळी तालुका माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात ६१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ८० रक्तदात्यांनी  रक्तदान केले.      या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सीबीसी, एचबीए1, आणि लिक्विड प्रोफाईल यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. एकूण ६१ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला , तर ८० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले....

बीड जिल्ह्यातून शिंदे सेनेत इनकमिंग वाढले..... आणखी एका नेत्याचा प्रवेश

 माजी आ.संगीता ठोंबरे यांचा शिंदे सेनेत प्रवेश



केज (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी(शरद पवार)ला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह आज(दि.18) शिवसेना पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेदेखील उपस्थित होते. शिरसाटांनी ठोंबेर यांचे अभिनंदन केले व केज विधानसभेमध्ये शिवसेना पक्षाला बळकटी मिळेल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, शिवसेना नेते अनिल जगताप, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना नेते अजित  पिंगळे  यांच्यासह शिवसेनेचे नेते व पदाधिकारी हजर होते. 

यांनीही केला शिवशेनेत प्रवेश..!

आमदार ठोंबरे यांच्यासोबत डॉ. विजय प्रकाश ठोंबरे, कुंभेफळचे माजी सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय  केंद्रे, अशोक सक्राते ,  अरविंद चाळक,  उमेश चाळक यांच्यासह केज मतदार संघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

जि.प.च्या अध्यक्षपदावर डोळा...

2014 मध्ये भाजपा तर्फे केज विधान सभेच्या आमदार राहिलेल्या संगीता ठोंबरे यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारून नमिता मुंदडा यांना दिली. त्यानंतर आमदार होण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्तीने राष्ट्रवादी(शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. मात्र, यावेळीही त्यांचा अपेक्षाभंग झाला. परंतु आता डोळा आगामी जि.प. निवडणुकीवर लागला आहे. यासाठीच त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याची चर्चा केज मतदारसंघात रंगली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या