नगरसेविकेचा स्तुत्य उपक्रम.....

इमेज
विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची -  नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई  धर्माधिकारी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका कविता इंगळे यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)    विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.त्या डॉ.भालचंद्र वाचनालयासाठी नगरसेविका कविता अनंत इंगळे यांच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभ्यासिकेसाठी स्पर्धा पुस्तके भेट देण्यात आली.त्या स्विकारतांना त्या बोलत होत्या.     नगरसेविका सौ .कविता अनंत इंगळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंती निमित्ताने परळीचे वैभव असलेल्या डॉ.भालचंद्र वाचनालयातील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट दिली. ही पुस्तके नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, शिक्षण सभा...

कोण होणार परळीचा उपनगराध्यक्ष? स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला मिळणार संधी?

 परळी नगरपरिषद उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीसाठी उद्या होणार बैठक 





परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर आता आज दिनांक 15 रोजी परळी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा पार पडणार आहे. या विशेष सभेत परळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी होणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवड प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

    परळी नगरपरिषद निवडणूक 2025 नंतर आता आज दिनांक 15 रोजी उपनगराध्यक्ष व  नामनिर्देशित सदस्य म्हणून सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची ही विशेष सभा पार पडणार असून पीठासन अधिकारी म्हणून अरविंद लाटकर हे निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी एक वाजता विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची निवड होणार आहे. आवश्यकता असल्यास या पदांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात येईल. त्यानंतर अधिकृत उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी जाहीर केल्या जातील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

    दरम्यान, परळी नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा रिपाई व मित्रपक्ष महायुती ला भरभरून यश मिळालेले आहे. सभागृहात त्यांचे संपूर्ण बहुमत असून या अनुषंगाने उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य महायुतीच्या गटातूनच होणार हे निश्चित असले तरी महायुती मधून उपनगराध्यक्ष पदावर कोणाला संधी मिळते आणि चार नामनिर्देशित सदस्यांच्या जागांसाठी कोणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्य पदाकरिता एकूण पाच अर्ज दाखल झाले होते त्याची छाननी आज उपविभागीय अधिकारी परळी यांनी केली. या छाननीनंतर हे पाचही अर्ज वैध झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. नामनिर्देशित सदस्य पदाकरिता सर्वश्री देशमुख दीपक रंगनाथराव, देवीप्रसाद चुन्नीलाल पांडे, बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी, प्रणव प्रकाश मराठे, अजीज अब्दुल हबीब कच्छी यांच्या नामनिर्देशन पत्रांचा समावेश आहे.

    

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!