पुणे- हैद्राबादचा शाही थाट परळी शहरात उपलब्ध...

 "कल्पना साडी फॅमिली शॉपींग मॉल" आजपासुन परळीकरांच्या सेवेत 





ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शानदार समारंभात होणार  महाशुभारंभ


पुणे- हैद्राबादचा शाही थाट शहरात उपलब्ध करुन देणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे तापडीया परिवाराचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- अगदी मुंबईचा मॉडर्न ट्रेंड असो वा चेन्नईचे ऑथेंटिक सिल्क.. पुणे - हैद्राबाद येथील शाही थाट आपल्या परळी वैजनाथ शहरात अनुभवायला मिळणार आहे. पुणे - मुंबईच्या झगमगटाला लाजवणारे 'कल्पना साडी फॅमिली शॉपींग मॉल परळीकरांच्या सेवेत दाखल होत आहे. या भव्य दिव्य दालनाचा महाशुभारंभ आचार्य गोविंददेवगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी होणार आहे. स्नेहबंधाच्या धाग्यांनी विणलेलं एक अतूट नातं कायम ठेवण्यासाठी या शुभारंभसोहळ्यास परळी व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओमप्रकाश तापडिया व परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

    गेल्या 38 वर्षापासून कल्पना साडी आणि मॅचिंग सेंटरच्या माध्यमातून परळीकरांशी घरोब्याचे नाते निर्माण केलेले तापडीया परिवार आता पुढचे टाकत आहे. आता साड्यांसोबत एकाच छताखाली फॅशनचे संपूर्ण विश्व,रेडीमेड, शूटिंग-शर्टिंग, ड्रेस मटेरिअल्स, हँडलूम, मॅचिंग, किड्स वेअर, फॅशन अॅक्सेसरीज आणि बरेच काही. मुंबईचा मॉडर्न ट्रेंड असो वा चेत्रईचे ऑथेंटिक सिल्क, पुणे-हैद्राबादचा शाही थाट तापडीया परिवाराने आपल्या शहरात आणलाहे. मेट्रो सिटी दर्जाची भव्य व्हरायटी आणि वाजवी दर घेऊन नविन भव्य दालन परळीकरांच्या सेवेत दाखल होत आहे. परळीकरांची चोखंदळ आवड लक्षात घेऊन तापडिया परिवाराने हे दालन भव्य दिव्य सुरु करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. कल्पना साडी फॅमिली शॉपींग मॉल या भव्य दालनाचा महाशुभारंभ सोहळा रविवार दि.4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता "कल्पना हाऊस", विवेकानंद नगर येथे संपत्र होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत आचार्य गोविंददेवगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने हे दालन जनतेच्या सेवेसाठी दाखल होत आहे. राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा उदघाटन समारंभ संपत्र होणार आहे. कल्पना साडी फॅमिली शॉपींग मॉल या भव्य दालनाच्या महाशुभारंभ सोहळ्याला आपण केवळ ग्राहक म्हणून नाही तर कल्पनापरिवाराचे सदस्य म्हणून उपस्थित राहावे असे आवाहन ओमप्रकाश मदनलाल तापडीया, अमर ओमप्रकाश तापडीया, अजय ओमप्रकाश तापडीया आणि कल्पना परिवाराने केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!