#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध स्मृती पुरस्कारांचे वितरण

परळीत ६ जानेवारीला दर्पण दिन सोहळा : आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत डॉ. वि. ल. धारूरकर यांचे व्याख्यान 



पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध स्मृती पुरस्कारांचे वितरण 

परळी प्रतिनिधी :महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी परळी येथे दर्पण दिन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आली आहे.

       हा कार्यक्रम परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता सुरू होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व माजी शिक्षण सभापती शंकराप्पा मोगरकर असणार आहेत.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (शिंदे गट) बीड जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. टी. पी. मुंडे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड, परळी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे, काँग्रेस शहराध्यक्ष बहादूर भाई, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, नायब तहसीलदार परवीन पठाण, अल्ट्राटेक सिमेंट फॅक्टरीचे जनसंपर्क अधिकारी कुलदीप खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

      या दर्पण दिन सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार असून, पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध स्मृती पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पत्रकार बांधवांचा पुरस्कार देऊन होणार गौरव....

मोहनलाल बियाणी स्मृती पुरस्कार – धनंजय आढाव (दिव्य मराठी)

प्रकाश नवाडे स्मृती पुरस्कार – ओमप्रकाश बुरांडे (मराठवाडा साथी)

एम. पी. कनके स्मृती पुरस्कार – आत्मलिंग शेटे (संपादक, परळी समाचार)

भास्करराव जोशी स्मृती ‘जगमित्र’ पुरस्कार – लक्ष्मण वाकडे (ज्येष्ठ पत्रकार)

कैलास शर्मा स्मृती पुरस्कार – प्रा. प्रवीण फुटके (दैनिक सकाळ)

प्रशांत जोशी स्मृती पुरस्कार – धनंजय आरबुने (दैनिक पुण्यनगरी)

       याप्रसंगी पत्रकारिता, समाज आणि लोकशाही यांच्यातील नाते, माध्यमांची जबाबदारी व आजच्या काळातील पत्रकारितेची भूमिका यावर डॉ. वि. ल. धारूरकर आपले मार्गदर्शन करणार आहेत.या दर्पण दिन कार्यक्रमास शहरातील व तालुक्यातील सर्व संपादक, पत्रकार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रानबा गायकवाड, नितीन ढाकणे, शेख मुकरम, संतोष जुजगर, अनुप कुसुमकर समीर इनामदार भगवान साकसमुद्रे, बालाजी जगतकर मिलिंद चोपडे बालासाहेब जगतकर, शेख मुदस्सीर, विकास वाघमारे, सय्यद सबाअत अली, बालाजी ढगे, सय्यद अफसर शेख बाबा, अमोल सूर्यवंशी, अतुल बडे, संपादक सुग्रीव शिरसागर, बाळासाहेब मुजमुले अशोक गलांडे, बाळासाहेब गरड रमेश लहाने नितेश काळे श्रीमंत खांडेकर, बापू किरवले, विद्याधर शिरसाठ डॉक्टर जे एन शेख सम्राट गायकवाड नवनाथ दाने, जावेद पठाण,अशोक जोगदंड केशव कांबळे आनंद तुपसमुद्रे आदिंनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....