प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

सायंकाळी ५ वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभा

 परळीत उद्या स्व. अजितदादा पवार यांच्या सर्वपक्षीय शोकसभेचे आवाहन







सायंकाळी ५ वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभा

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर परळी वैद्यनाथ येथे आज सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.


स्व. अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघावर अजितदादांनी प्रचंड प्रेम केले. परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत विकास आराखड्यास पाच पट मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला. अनेक कार्यक्रम व राजकीय सभांच्या निमित्ताने अजितदादा परळी शहरात अनेकवेळा येऊन गेले, त्यामुळे परळीकरांचे स्व. अजित दादांशी अतूट व भावनिक नाते होते. 


त्यांच्या दुर्दैवी अकाली निधनानंतर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून स्व. अजितदादा यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व परळीकर नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या