#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

मराठवाडा जनता विकास परिषद,परळी यांची सिनीअर डीसीेएम यांच्याकडे मागणी

परळी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सह ईतरत्र रेल्वे सेवा सुरू करावी-चेतन सौंदळे




मराठवाडा जनता विकास परिषद,परळी यांची सिनीअर डीसीेएम यांच्याकडे मागणी

परळी वैजनाथ/प्रतिनिधी 

  परळी -मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यासह नांदेड -पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या प्रवाशी,स्लीपर तसेच ए.सी.बोगींची संख्या तात्काळ वाढवावी तसेच परळी मार्गे पुणे,मुंबई,नागपुर,तिरूपती,अयोध्या,वाराणसी,गोवा व ईतर प्रमुख ठिकाणासाठी त्वरीत रेल्वे सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन सिकंद्राबाद  रेल्वे विभागाचे सिनिअर डीसीएम शिफाली कुमार यांना दि.16 जानेवारी 2026 रोजी रेल्वे स्थानकाच्या तपासणीनिमित्त आले असताना परळी रेल्वे स्थानकात देण्यात आले.

याप्रसंगी परळी मराठवाडा जनता विकास परीषद अध्यक्ष तथा माजी नगरसेवक चेतन सौंदळे,मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांच्यासह पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 नांदेडहुन मुंबईला जाणा-या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे कनेक्शन मिळावे म्हणून परळी येथून पहाटे निघणा-या परळी- आदिलाबाद या पॅसेंजर रेल्वेची वेळ बदलावी   तसेच प्रवासी जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने पुढील महत्वपूर्ण मागण्या देखील निवेदनात करण्यात आल्या आहेत.

1)मछलीपट्टणम -बीदर, सिकंद्राबाद-बीदर इंटरसिटी एक्सप्रेस,पाटणा-पूर्णा,रायचूर-परभणी ईत्यादी रेल्वे सेवा परळी-वैजनाथ पर्यंत त्वरीत विस्तारीत करावी.

2) 'पूर्णा-परळी' रेल्वे परत जाताना बहुअंशी रिकामीच असते त्या ऐवजी ती लातूर- कुर्डवाडी किंवा उदगीर-बीदर पर्यंत विस्तारित करावी.

3)अमरावती -पुणे व कोल्हापुर-नागपुर रेल्वे नियमित कराव्यात 

4)क्राॅसिंगच्या निमित्ताने घाटनांदूर,वडगाव (निळा) इत्यादी स्टेशन वर विविध गाड्या विनाकारण अधिक वेळ खोळंबून ठेवू नयेत,परळी रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयाची कामाची वेळ वाढवावी.

5)प्रवाशांच्या अधिक सुरक्षाकरिता आरपीएफ व जीआरपी पोलीस संख्या वाढवून संबंधित विभागाचे वरीष्ठ कार्यालय तात्काळ निर्माण करावे

6)रेल्वे स्टेशन व परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरा व रेल्वे डब्ब्यांचे डिस्पले चालू ठेवणे

यासह ईतर मागण्या करण्यात आल्या यावेळी डीसीेम शिफाली कुमार यांनी परळी रेल्वे स्थानकातील अद्यावत सुविधा व प्रवाशांच्या सोयींकरिता करण्यात येत असलेल्या कामकाजाविषयी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या यावेळी मराठवाडा जनता विकास परीषद,परळी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक चेतन सौंदळे,पदाधिकारी श्रीकांत पाथरकर,ऋषीकेश बारगजे,गजानन हालगे,निरंजन गौरशेट्टे,दीपक कुरील आदिंची उपस्थिती होती.

 परळी मार्गे विविध ठिकाणी रेल्वे सुरू करणे तसेच पिट लाईन यंत्रणा व रेल्वे स्थानकात अद्यावत सुविधा निर्माण करण्याचे काम रेल्वे विभागामार्फत जलद गतीने करण्याकरिताची शिफारस रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याचे आश्वासन शिफाली कुमार यांनी शिष्टमंडळास दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....