प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली!!!

 मधुकरराव विनायकराव तांबट यांचे अल्पशा आजाराने निधन





परळी वैजनाथ/प्रतिनिधी 

श्री कालिका देवी डिग्रस संस्थानचे कार्यकारी, कासार समाजाचे सेवक, सर्व परिचित व्यक्तिमत्व मधुकरराव विनायकराव तांबट यांचे आज रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी पहाटे ३.१५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 

श्री मधुकरराव विनायकराव तांबट राहणार हालगे गल्ली, जुनी हैदराबाद बँकेच्या बाजूला परळी वैजनाथ यांचे आज रविवारी निधन झाले. कै.सुधीर व श्री नितीन (पप्पू)  तांबट  यांचे ते वडील होते. मधुकरराव तांबट हे अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी असल्याने सर्व परिचित होते. परळी शहरातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमी सहभागी असत. अत्यंत प्रेमळ व लहान थोरापासून सर्वांना प्रेमाने बोलणारे मधुकरराव तांबट यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, चार बहिणी, एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.  या दुःखद घटनेमुळे तांबट परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या दुःखात दैनिक एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या