इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

असा असेल समित्या व सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम......

 परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या स्थायी समिती, विषय समित्या व सभापती पदांच्या उद्या होणार निवडी




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या स्थायी समिती, विषय समित्या व सभापती पदांच्या २७ रोजी निवडी होणार आहेत. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे. परळी वैजनाथ नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीची एकहाती सत्ता आहे. नगराध्यक्षा,उपनगराध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे या निवडीत भाजपच्या हिश्शाला किती सभापतीपदे येणार तसेच कोणाकोणाची सभापती पदी वर्णी लागणार याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

        नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये निवडून आलेल्या परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या सदस्यांची नावे दिनांक २३.१२.२०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तसेच परळी वैजनाथ नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक १५/०१/२०२६ रोजी पार पडली असुन या सभेमध्ये उपाध्यक्ष यांची निवड व नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परळी वैजनाथ नगरपरिषद ही ''ब" वर्ग नगरपरिषद असल्याने, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ६२ अन्वये "ब" वर्ग नगरपरिषदांसाठी सहा विषय समित्या असतील. यामध्ये स्थायी समिती, बांधकाम समिती, आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, शिक्षण समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी होणार आहेत. त्याचबरोबर स्थायी समितीवर निवडावयाच्या सदस्यांची ही निवड यावेळी करण्यात येणार आहे.

असा असेल समित्या व सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम......

१.२७/०१/२०२६ सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० पर्यंत : विषय समित्यांची सदस्य संख्या ठरविणे व उपाध्यक्ष ज्या विषय समितीचा पदसिध्द सभापती असेल, ती समिती ठरविणे. तसेच विषय समित्यांवर परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करणे.

२.२७/०१/२०२६ दुपारी १२.०० ते दुपारी २,०० पर्यंत : मुख्याधिकारी यांचेकडे विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणूकीकरीता स्वतः नामनिर्देशनपत्र सादर करणे.

३. २७/०१/२०२६ दुपारी २.०० ते २.३० पर्यंत : नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे.

४.२७/०१/२०२६ दुपारी २.३० नंतर :.वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे.

५. २७/०१/२०२६ दुपारी २.४५ पर्यंत. : नामनिर्देशनपत्र मागे घेणे,

६.२७/०१/२०२६ दुपारी २.४५ नंतर :निवडणूक लढविणा-या उमेदवारांची नांवे वर्णानुक्रमे घोषित करणे.

७.२७/०१/२०२६ दुपारी ३.०० नंतर :आवश्यकतेनुसार विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणूकीसाठी मतदान घेणे व निकाल घोषित करणे.

८. २७/०१/२०२६ दुपारी ३.३० नंतर :स्थायी समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन उक्त अधिनियमातील कलम ६३ (२-ब) मध्ये निर्धारीत केलेल्या पध्दतीनुसार करणे व कलम ६४ प्रमाणे स्थायी समितीचे गठण करणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....