करियर मार्गदर्शन.......

 इंदपवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत पोलीस निरीक्षक मझहर अली यांचे मार्गदर्शन




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

ध्येय गाठायचं असेल तर खडतर मेहनत घेण्याशिवाय पर्याय नसतो असा मोलाचा सल्ला देत परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मजहर अली  यांनी विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतरच्या करिअरच्या वाटा संदर्भात मार्गदर्शन केले. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी या ठिकाणी आज परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मझहर अली  यांनी भेट देऊन इयत्ता सहावी, सातवीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थिनीला आणि विद्यार्थ्यांना आपलं ध्येय विचारत त्यांनी त्या वाटेवर जाण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागेल याची माहिती देत प्रोत्साहन दिले. 

शालेय वयातच आपले ध्येय निश्चित करून त्या वाटेवर जाण्यासाठी आजपासूनच मेहनत करणे आवश्यक आहे असे पुढे ते म्हणाले. याच अनुषंगाने बोलताना पुढे ते म्हणाले की आपल्याला गुड टच आणि बॅड टच यातील फरक कळला पाहिजे. या वर्गातील मुलींशी बोलताना त्यांनी आठवणीने सांगितले की तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, कुठेही अडचण आली तर पोलिसांशी संपर्क साधायला घाबरू नका. विद्यार्थ्यांनीही त्यांच्याशी गप्पा मारत मनातील प्रश्न विचारले. 

शाळेचे मुख्याध्यापक सुभाष केंद्रे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष केशव मुंडे आणि शाळेतील शिक्षक चंद्रशेखर फुटके, दीपक खंदारे,चंद्रप्रकाश लोखंडे, विष्णू ढाकणे त्यांचे याप्रसंगी स्वागत केले. कु क्रांती केंद्रे हिने त्यांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!