प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

अशी आहे समित्यांची रचना: कोणाचा कोणत्या समितीत समावेश....

परळी वैजनाथ नगरपरिषद स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडी

परळी वैजनाथ , प्रतिनिधी....

      नगरपरिषदेच्या स्थायी समितीची रचना व निवड आज करण्यात आली. त्याचबरोबर नगर परिषदेच्या अन्य पाच विषय समित्यांच्या सभापतींची निवड व समित्यांची रचनाही आज करण्यात आली. सभापती पदाच्या निवडीत उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादीला सोडल्यानंतर भाजपाचा वरचष्मा दिसून आला आहे. एकूण पाच विषय समित्यांपैकी तीन विषय समित्यांवर भाजपाचे सभापती विराजमान झाले आहेत. तर अन्य दोन समित्यांमध्ये एक राष्ट्रवादीच्या तर एक शिवसेनेच्या वाट्याला सभापती पद देण्यात आले आहे.

           परळी वैजनाथ नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, रिपाई, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीची एकहाती सत्ता आहे. या अनुषंगाने उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी वेळी भाजपाच्या वाट्याला उपनगराध्यक्ष पद येणार असे अपेक्षित असताना अनपेक्षितपणाने उपनगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला संधी देण्यात आली होती. त्यामुळे विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची वाटणी होताना निश्चितपणाने भाजपच्या हिश्याला अधिकची सभापती पदे देण्यात येतील हे अपेक्षित होते. त्या अनुषंगानेच आज पार पडलेल्या नगरपरिषदेच्या  सभेत अशाच पद्धतीच्या निवडी झाल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेत सर्वात महत्त्वाची समिती म्हणून स्थायी समिती असते. या स्थायी समितीची रचना करण्यात आली असून दहा जणांची स्थायी समिती तयार झाली आहे. यामध्ये नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी सभापती तर उपाध्यक्ष तथा नियोजन व विकास समिती सभापती पठाण खैसर राजा खान यांच्यासह अन्य पाच विषय समित्यांचे सभापती आणि तीन नामनिर्देशित सदस्य अशी दहा जणांची स्थायी समिती राहणार आहे.स्थायी समितीत नामनिर्देशित सदस्य म्हणून वैजनाथ भानुदास सोळंके, कविता अनंत इंगळे व डॉ. पूजा प्रितेश तोतला यांचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी भाजपाचे मुंडे पवनकुमार महादेव, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतीपदी भाजपाचे मेनकुदळे योगेश विजयकुमार, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कराड प्राजक्ता श्रीकृष्ण, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या जयश्री रवींद्र गित्ते, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या अंजली केशव बनसोडे तर उपसभापतीपदी सय्यद फर्जना बेगम सय्यद सादेक यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

 अशी आहे समित्यांची रचना: कोणाचा कोणत्या समितीत समावेश

1. सार्वजनिक बांधकाम समिती : 

मुंडे पवनकुमार महादेव (सभापती)

सदस्य:1. अर्चना महेंद्र रोडे,2. अल्ताफ खान सरदार खान पठाण,3. रोडे महादेव नागनाथ,4. मुंडे दिपक प्रल्हादराव5. देवीप्रसाद चुन्नीलाल पांडे,6. पवनकुमार महादेव मुंडे,7. मीरा केशव नागरगोजे, 8. योगेश विजयकुमार मेनकुदळे, 9. नितीन माणिक बागवाले

2. शिक्षण, क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती :

मेनकुदळे योगेश विजयकुमार (सभापती)

सदस्य:1. सय्यद फरजाना बेगम स. सादेक, 2. मुरकुटे लक्ष्मण जनार्धन 3. मुंडे दिपक प्रल्हादराव,4. सुनिल भाऊसाहेब कांबळे,5. शेख अब्दुल रहेमान हाजी बाबु अब्दुल रशीद6. अंजली केशव बनसोडे,7. योगेश विजयकुमार मेनकुदळे 8. जयश्री शंकरअप्पा मोगरकर,9. कुरेशी आरेफा बेगम महेबुबपाशा


3. स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती:

कराड प्राजक्ता श्रीकृष्ण(सभापती)

सदस्य:1. लाहोटी शिल्पा जयपाल,2. अजीज अब्दुल हबीब कच्छी,3. प्राजक्ता श्रीकृष्ण कराड,4. व्यंकटेश बाबुराव शिंदे5. सचिन रामनाथ सारडा,6. अश्विनी राहुल केंद्रे,7. वंदना अश्विनकुमार आघाव,8. पवनकुमार महादेव मुंडे 9. नितीन माणिक बागवाले

4. पाणी पुरवठा आणि जलनिःसारण समिती :

जयश्री रवींद्र गित्ते(सभापती)

सदस्य:1. नितीन नामदेव रोडे,2. अर्चना महेंद्र रोडे3. इस्माईल मौला शेख, 4. रूपाली रमेश पवार,5. जयश्री रविंद्र गित्ते6. वंदना अश्विनकुमार आघाव,7. अश्विनी राहुल केंद्रे,8. डॉ. पुजा प्रितेश तोतला,9. कुरेशी आरेफा बेगम महेबुबपाशा

5. नियोजन आणि विकास समिती :

1. पठाण खैसर राजाखान(सभापती),2. बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी,3. कविता अनंत इंगळे,4. सचिन रामनाथ सारडा,5. वैजनाथ भानुदास सोळंके,6. जयश्री शंकरअप्पा मोगरकर,7. कुसूमताई अण्णासाहेब चाटे,8. मीरा केशव नागरगोजे,9. नितीन माणिक बागवाले

6. महिला व बालकल्याण समिती: 

अंजली केशव बनसोडे(सभापती)

1. डावरे सरोजा गौतम, 2. बळवंत रेश्मा केशव,3. शेख आयेशा मोसीन,4. देशमुख प्रतिक्षा रणजीत,5. सय्यद फरजाना बेगम स. सादेक 6. अंजली केशव बनसोडे,7. कुसुमताई अण्णासाहेब चाटे,8. अॅड. प्रणव प्रकाश मराठे, 9. कुरेशी आरेफा बेगम महेबुबपाशा


स्थायी समिती:

1 सौ. पद्मश्री बाजीराव धमर्माधिकारी– अध्यक्षा

सदस्य: 2.पठाण खैसर राजाखान (उपाध्यक्षा तथा नियोजन व विकास समिती सभापती),3.मुंडे पवनकुमार महादेव  (सार्वजनिक बांधकाम समिती सभापती सदस्य),4. मेनकुदळे योगेश विजयकुमार (शिक्षण क्रिडा व सांस्कृतीक समिती सभापती),5. कराड प्राजक्ता श्रीकृष्ण( स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती),6. जयश्री रविंद्र गित्ते (पाणी पुरवठा आणि जलनिःसारण समिती सभापती), 7.अंजली केशव बनसोडे (महिला व बालकल्याण समिती सभापती),8.वैजनाथ भानुदास सोळंके (नामनिर्देशीत सदस्य),9.कविता अनंत इंगळे(नामनिर्देशीत सदस्य),10 डॉ. पुजा प्रितेश तोतला (नामनिर्देशीत सदस्य)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या