प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

हातातील ते घड्याळ पाहताच अधिकारीही रडले

 शेवटी हातातील 'घड्याळ' हीच ठरली अजितदादांची शेवटची ओळख! 




ajit pawar died in plane crash: बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते, अखेर हातातील घड्याळावरून अजित दादांची ओळख पटल्याचे समोर आले आहे.

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून बारामतीसह राज्यावर शोककळा पसरली आहे. अत्यंत भीषण असलेल्या या अपघातात मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते, अखेर हातातील घड्याळावरून अजित दादांची ओळख पटल्याचे समोर आले आहे.

घड्याळावरून पटली ओळख

अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची अवस्था पाहून उपस्थितांचा थरकाप उडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून १५-२० मिनिटांत आग आटोक्यात आणली. मृतदेहांचे चेहरे ओळखता येत नव्हते, एक मृतदेह पूर्णपणे जळालेला आणि सुजलेला होता. मात्र, त्या मृतदेहाच्या हातातील घड्याळावरून हा मृतदेह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच असल्याचे पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट झाले. योगायोगाने, 'घड्याळ' हेच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतरही अजित दादांकडे घड्याळच !  

     राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार वेगळे झाले. कायदेशीर लढाईनंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांनाच मिळालं. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला तेव्हा चरखा या चिन्हाची मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाने ते नाकारलं. त्यानंतर राष्ट्रवादीकडून१० वाजून १० मिनिटांची वेळ दाखवणाऱ्या घड्याळ चिन्हाची मागणी केली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह 'निळ्या रंगाचे आलार्म घड्याळ' हे आहे.

प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरार

अपघात झाला तेव्हा जवळच असलेल्या ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. एका महिलेने घटनेचे भयानक वर्णन करताना सांगितले की, "आम्ही आमच्या म्हशींजवळ होतो. स्फोट आणि आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की आम्ही बादल्यांमध्ये पाणी घेऊन धावत सुटलो. तिथे मृतदेह विखुरलेले होते. एका मृतदेहाचे शिर धडावेगळे झाले होते. आम्ही खूप घाबरलो होतो, तरीही आम्ही ब्लँकेट आणि कपडे आणले आणि ते विखुरलेले मृतदेह झाकले. पोलिसांना येण्यासाठी वेळ लागणार होता, तोपर्यंत आम्ही तिथे उभे होतो."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या