इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

 प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – संजय सेवलकर 



परळी (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राणी लक्ष्मीबाई टावर  चौक येथे  २६  जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भारतमातेचे पूजन व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विक्रम चहाचे वितरक संजय सेवलकर यांनी केले आहे. 

     सूर–संगम ऑर्केस्ट्राच्या वतीने सादर होणाऱ्या या कार्यक्रमात निवेदक व गायक  लालाजी के. परळीकर तसेच  अमोल तरकसे सर देशभक्तीपर गीतांची सादरीकरण करणार आहेत.

यावेळी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी तात्या विंचू यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून उपस्थितांसाठी जिलेबी वाटपाचेही आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विक्रम चहा चे वितरक  संजय सेवलकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या