इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

पुण्याच्या अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने केला सामाजिक सेवेचा गौरव

बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ;ना. पंकजाताई मुंडे डी. लिट. पदवीने सन्मानित


पुण्याच्या अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने केला सामाजिक सेवेचा गौरव



पुणे ।दिनांक २४।

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने आज शैक्षणिक क्षेत्रातील मानाची डी लिट (मानद डॉक्टरेट) पदवी देऊन सन्मान केला. या गौरवाने बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.


    लोहगांव येथील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ आज मोठया थाटात पार पडला. ना. पंकजाताई मुंडे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. ना. पंकजाताई मुंडे हया राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असून पर्यावरण व पशुसंवर्धन खात्यामार्फत गेल्या वर्षभरात अनेक लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले आहेत, याशिवाय  सामाजिक कार्यातही त्या सातत्याने अग्रेसर असतात.  या  कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी 'मानद डॉक्टरेट' (डी.लिट.) देऊन आज सन्मान केला.


  या कार्यक्रमास अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपती डॉ अजिंक्य पाटील, श्री धरमकुमार सिरजी हाय कमिशनर ऑफ रिपब्लिक ऑफ गायना, डॉ. निशिकांत ओझा मुख्य सल्लागार इंटींग्रेटेड डिफेन्स स्टाफ भारत सरकार, श्रीमती पूजा पाटील चेअरमन डी वाय पाटील विद्यापीठ, आमदार बापूसाहेब पठारे, प्राध्यापक व पदवीप्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या