प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

शिरसाळा परिसरात खळबळ...

 सिरसाळा येथे पैशाच्या वादातून दिले ढकलून; एकाचा मृत्यू; आरोपी ताब्यात







परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा.....

       सिरसाळा येथे पैशाच्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजू गंगाराम उबदे (वय 40, रा. शिरसाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

      सायलू रामलू पस्तमवाड व गंगा पस्तमवाड (दोघेही रा. सिरसाळा) यांनी संजू उबदे याला पाठीवर जोरदार धक्का दिला. त्यामुळे संजू उबदे हा तोल जाऊन तोंडावर पडला आणि गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सायलू रामलू पस्तमवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उसणे दिलेल्या पैशांच्या वादावरून संजू उबदे, सायलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांच्यात जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यातूनच एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सीरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.  पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सीरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या