#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

परळीच्या वैभवात भर ; कल्पना साडी फॅमिली शॉपींग मॉलचे शानदार उद्घाटन

 परळीतील बाजारपेठ आधीपासूनच मोठी; ती समृद्ध करण्यासाठी आम्ही खंबीरपणे पाठीशी - ना. पंकजा मुंडे 




तापडीया कुटुंबीयांच्या धाडसाचे कौतुक ; परळीच्या वैभवात टाकली भर - आ. धनंजय मुंडे 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- मोठमोठ्या महानगरांसारखे साड्यांचे भव्य दालन तापडिया कुटुंबाने परळीत उभे करून आपल्या परळीच्या व्यापारपेठेची शोभा वाढवली आहे. परळीची बाजारपेठ ही जुन्या काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. ही बाजारपेठ अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही व्यावसायिकांच्या व व्यापाऱ्यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली. तर एवढ्या मोठ्या व्यवसायाचे शॉपिंग मॉल परळीमध्ये सुरु करून व्यवसायिकांच्या दृष्टीने तापडिया कुटुंबाने खूप मोठे धाडस केलेले आहे. एक परळीकर म्हणून आपल्याला याचा निश्चितच आनंद  व अभिमान आहे. हा व्यवसाय परळीच्या वैभवात नक्की भर घालणारा असल्याचे माजी मंत्री आ .धनंजय मुंडे यांनी सांगितले.

      अगदी मुंबईचा मॉडर्न ट्रेंड असो वा चेन्नईचे ऑथेंटिक सिल्क.. पुणे - हैद्राबाद येथील शाही थाट  परळी वैजनाथ शहरात अनुभवायला मिळणार आहे. पुणे - मुंबईच्या झगमगटाला लाजवणारे 'कल्पना साडी फॅमिली शॉपींग मॉल परळीकरांच्या सेवेत आज  दाखल झाले. या भव्य दिव्य दालनाचा महाशुभारंभ राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी परळीच्या नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, लातूर येथील एडवोकेट मेहुल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वप्रथम ओमप्रकाश मदनलाल तापडीया, अमर ओमप्रकाश तापडीया, अजय ओमप्रकाश तापडीया आणि कल्पना परिवाराच्या वतीने मान्यवरांचे आत्मीय स्वागत करण्यात आले..गेल्या 38 वर्षापासून कल्पना साडी आणि मॅचिंग सेंटरच्या माध्यमातून परळीकरांशी तापडीया परिवाराने नाते निर्माण केलेले आहे. याची प्रचिती ही या कार्यक्रमात दिसून आली. परळी शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, ग्राहक  आवर्जून आत्मेतेने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

       कल्पना साडी फॅमिली शॉपींग मॉलमध्ये आता साड्यांसोबत एकाच छताखाली फॅशनचे संपूर्ण विश्व,रेडीमेड, शूटिंग-शर्टिंग, ड्रेस मटेरिअल्स, हँडलूम, मॅचिंग, किड्स वेअर, फॅशन अॅक्सेसरीज आणि  मुंबईचा मॉडर्न ट्रेंड असो वा चेत्रईचे ऑथेंटिक सिल्क, पुणे-हैद्राबादचा शाही थाट या मॉलमध्ये निर्माण करण्यात आला आहे परळीच्या व्यापारपेटे वैभव निर्माण करणारे नवीन व्यावसायिक झाल्याने साखळी या निमित्ताने घरी राहिली आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....