#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

ट्युशनला जात असलेल्या अल्पवयीन मुलीला कारमधून नेऊन डोंगरात निर्जनस्थळी बलात्कार !





केज :- ट्युशनला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला कार मधून घेऊन जात डोंगरात तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.

केज तालुक्यातील एका गावात राहत असलेली साडे पंधरा वर्ष वयाची एक अल्पवयीन मुलीची धीरज सांजुरे याच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा धीरज सांजुरे याने घेण्याच्या उद्देशाने दि. ६ जानेवारी रोजी धीरज सांजुरे याने त्या अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे आमिष दाखविले. त्या नंतर दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ती अल्पवयीन मुलगी केज येथे ट्युशनला जाण्यासाठी केज येथे आली असता सकाळी ९:३० च्या सुमारास धीरज सांजुरे त्या अल्पवयीन मुलीला एका कार मधून घेऊन गेला. केज येथून त्याने तिला धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात घेऊन गेला. तिथे गेल्या नंतर एका निर्जनस्थळी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. 

त्या नंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीने ही माहिती तिच्या पालकांना दिल्या नंतर पालकांनी पीडित मुलीसह केज पोलिस ठाणे गाठून या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....