#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

परळीत श्री चौंडेश्वरी देवीचा महोत्सव उत्साहात साजरा

श्री चौंडेश्वरी मातेच्या दर्शनाने नवी उर्जा मिळाली-नगराध्यक्षा सौ . पद्मश्रीताई धर्माधिकारी

कोष्टी समाजाच्या जागेचा प्रश्न दोन महिन्यात सोडवू - बाजीराव धर्माधिकारी 

परळी (प्रतिनिधी)  कोष्टी समाज परळीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री चौंडेश्वरी मातेचा पौष पौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्ती_भावाने साजरा करण्यात आला. श्री चौंडेश्वरी मातेच्या दर्शनाने मला परळीकरांसाठी काम करण्यासाठी नवी उर्जा मिळाली असून कोष्टी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवू असे परळी नगरीच्या नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी कोष्टी समाजाचा जागेचा प्रश्न दोन महिन्यात सोडवू असे अभिवचन दिले. 

         शहरातील गुरुकृपा नगर येथील श्री हनुमान मंदिरात दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता श्री चौंडेश्वरी देवीच्या महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात प्रारंभी श्री चौंडेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, नगरसेविका सौ. पूजाताई प्रितेश तोतला, नगरसेविका सौ. शिल्पाताई जयपाल लाहोटी, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयपाल लाहोटी, भाजपाचे पदाधिकारी तथा नगरसेविका पुत्र अश्विन मोगरकर, भाजपा युवा नेते प्रितेश तोतला आदी मान्यवरांचा कोष्टी समाज बांधवांच्या वतीने शाल, हार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कोष्टी समाजातील पत्रकार संतोष जुजगर यांची परळी शहर पत्रकार संघाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कोष्टी समाजाच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी म्हणाल्या की,  माजी मंत्री धनंजय मुंडे व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी शहराचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा असून कोष्टी समाजाचे प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडवू असे सांगत शाकंबरी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले व आज नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळ्याला जाण्यापूर्वी श्री चौंडेश्वरी देवीचा आशीर्वाद मिळाल्याने मला नवी ऊर्जा मिळाली असल्याचेही नगराध्यक्ष धर्माधिकारी म्हणाल्या.

           यावेळी आपले विचार मांडताना माजी नगराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले की, कोष्टी समाजाचा जिव्हाळ्याचा जागेचा प्रश्न येत्या दोन महिन्यात सोडवू व दिवाळी पर्यंत सभागृह बांधून देऊ असा शब्द माता चौंडेश्वरीच्या समोर दिला. आम्ही प्रत्येक समाज घटकासाठी काम करणार असून आत्तापर्यंत विविध समाजासाठी सभागृह बांधून दिले आहेत. येणाऱ्या काळात शहरातील पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करणार असल्याचे सांगत परळी शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. यावेळी नगरसेवक प्रा. पवन मुंडे, नगरसेविका सौ. डॉ. पूजा तोतला, नगरसेविका सौ. शिल्पा लाहोटी, जयपाल लाहोटी यांनी आपले विचार व्यक्त करीत कोष्टी समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी खंबीरपणे समाजाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.

      श्री चौंडेश्वरी मातेच्या महोत्सवाच्या सांगता समारंभ निमित्त सकाळी ६ वाजता होम हवन, ११ वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. दुपारी १२ वाजता ग्रंथ दिंडी, काढण्यात आली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन नंदकिशोर जातकर सर यांनी केले. प्रास्ताविक दिलीप हरेगावकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणेपार पाडण्यासाठी कोष्टी समाज बांधव व भगिनींनी परिश्रम घेतले.

 'भैय्या 'वहिनींच्या' लग्नाचा वाढदिवस साजरा 

       परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व परळी नगरीचे माजी नगराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी या पती -पत्नींचा लग्नाचा 21 वा वाढदिवस कोष्टी समाज बांधवांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या दोघांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला. सर्वांनी उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....