प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने भव्य प्रारंभ

विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालयात ‘कला अविष्कार’ स्नेहसंमेलनाने शारदानगर दुमदुमले!

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :

समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, परळी वैजनाथ संचलित विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालय, शारदानगर येथे आयोजित ‘कला अविष्कार’ वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ कार्यक्रम उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक चैतन्याच्या वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मजाताई बाजीराव धर्माधिकारी या होत्या.

कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचा सन्मान सोहळा मोठ्या आदरातिथ्याने पार पडला. अध्यक्ष सौ. पद्मजाताई बाजीराव धर्माधिकारी यांचा सत्कार श्रीमती मुंडे मॅडम यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. प्राजक्ताताई श्रीकृष्ण कराड यांचा सत्कार श्रीमती साखरे मॅडम यांनी केला, तर सौ. माधुरीताई योगेश मेनकुदळे यांचा सत्कार श्रीमती बरेवाड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेवक श्री. महादेव रोडे यांचा सत्कार संस्थेचे प्रशासकीय संचालक श्री. संजय कराड सर यांनी केला.

यावेळी श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. इटके साहेब यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. तिळकरी सर यांनी केला. संस्थेचे संचालक श्री. एम. टी. मुंडे साहेब यांचा सत्कार श्री. संदीप निला सर यांच्या हस्ते पार पडला. प्रशासकीय संचालक श्री. संजय कराड सर यांचा सत्कार मुख्याध्यापक श्री. तिळकरी सर यांनी केला, तर विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. तिळकरी सर यांचा सत्कार श्री. सुखदेव जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आला.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य, गीत व विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने पालक, शिक्षक व नागरिकांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण परिसर आनंद, उत्साह आणि संस्कृतीने भारावून गेला.

कार्यक्रमाचे बहारी सूत्रसंचालन श्री. जोगदंड सर व श्रीमती साखरे मॅडम यांनी अत्यंत नेटके व प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक व माजी मुख्याध्यापक श्री. मातेकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संदीप निला सर यांनी मानले.

या यशस्वी आयोजनाबद्दल मान्यवरांनी विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालय व समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या