मेव्हण्याच्या घरी वृद्धाची आत्महत्या 




केज :- केज शहरातील फुले नगर येथे एका ७२ वर्षीय इसमाने त्यांच्या मेव्हण्याच्या घरी पायऱ्याच्या ग्रीलला गमज्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

      

धाराशिव जिल्ह्यातील बहुला (ता. कळंब) येथील गुलाब विठ्ठल पवार (वय ७२) हे त्यांचे मेव्हणे गोरोबा सखाराम मस्के यांच्या केज शहरातील फुलेनगर भागातील घरी आले होते. गुलाब पवार यांनी ६ जानेवारी रोजी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास गोरोबा मस्के यांच्या घराच्या पायऱ्याच्या ग्रीलला गमज्याने गळफास लावून आत्महत्या केली. 

अक्षय गोरोबा मस्के यांच्या खबरे वरून केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस शिपाई नितीन जाधव हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!