१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.

इमेज
धर्मापुरीत ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा’ ज्ञानयज्ञास उद्यापासून प्रारंभ १०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण. परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तालुक्यातील धर्मापुरी येथील जागृत देवस्थान श्री रोकडेश्वर मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान चालीसा पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता या भक्तिमय सोहळ्याचा शुभारंभ होणार असून परिसरात आधीच धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ख्यातनाम ह.भ.प. भागवताचार्य कांतादेव महाराज (दादाहरी वडगावकर) यांच्या रसाळ वाणीतून सादर होणारी ‘श्रीमद् भागवत कथा’ होय. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा होणार असून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत भाविकांना सखोल कथाश्रवणाचचा मिळणार आहे. सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. लिंबाजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. श्रीकांतजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. सुशांत मह...

परळीच्या संवेदनशीलतेची व सकारात्मकतेची प्रचिती ..

धाडसी बुलेटस्वारी: एकटीच मुलगी; हैदराबाद वरून आली परळीत, प्रभू वैद्यनाथाचे दर्शन व दोन दिवस राहिली परळीत !

परळीकरांचे आत्मीय स्वागत आणि आपुलकीने युवती गेली भारावून


परळी वैजनाथ .....

      परळीच्या वातावरणाबाबत विनाकारण नकारात्मकता निर्माण करून परळीचे वातावरण खराब असल्याचे चित्र निर्माण करणाऱ्यांसाठी एक मूर्तीमंत उदाहरण व एक प्रकारची चपराक म्हणून एक घटना अधोरेखित होते. चारशे किलोमीटरचा हैदराबादचा पल्ला एकट्या मुलीने बुलेटवर स्वार होत पार केला. विशेष म्हणजे ती वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत आली. एकटीच मुलगी, तीही थेट हैद्राबाद येथून येऊन दोन दिवस परळीत राहिली. वैद्यनाथाच्या दर्शनाने आपले मन प्रसन्न झाले, परळीकरांनी केलेले स्वागत, कौतुक व येथील लोकांचे आपुलकी व आत्मीयतेचे  वागणे पाहून ती अतिशय समाधानी आणि काहीशी भारावूनच  रवाना झाली. परळीचे हे सकारात्मक वातावरणाचे वास्तव चित्र यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

    हैदराबाद येथील रमणी या तरुणीने नव वर्षाच्या निमित्ताने हैदराबाद ते परळी असा तब्बल ४०० किलोमीटरचा प्रवास केवळ सात तासांत एकटीने धाडसाने पूर्ण केला. परळीत प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शनिवारी ती पोहोचल्यानंतर तिचे परळीकर  नागरिकांनी कौतुक करत तिचे आत्मवितेने स्वागत केले. हैदराबाद येथील रमणी हिस बाईक रायडिंगची आवड आहे. तिने २०२६ या नव्या वर्षाची सुरुवात आध्यात्मिक व साहसी उपक्रमातून पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. या संकल्पानूसार तिने हैदराबादहून परळीपर्यंत सलग ७ तासांचा प्रवास पूर्ण केला. रविवारी सकाळी परळीत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर तिने आनंद व्यक्त केला. परळीत दर्शनानंतर ती अंबाजोगाई येथे योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी रवाना झाली.महिलाही कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे या तरुणीच्या बाईक सवारीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आध्यात्मिक श्रद्धा आणि साहसाची तीने सांगड घालत केलेला हा प्रवास अनेक तरुण-तरुणींना प्रेरणादायी ठरला आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन झाल्यानंतर संपूर्ण प्रवासाचा थकवा क्षणात निघून गेला. इतक्या लांबचा प्रवास एकटीने करून येथे पोहोचल्याचे विशेष समाधान आहे. प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्याने मन प्रसन्न झाले असून नव्या वर्षाची ही सुरुवात आयुष्यभर लक्षात राहील, असे रमणी हिने परळीत पोहोचल्यानंतर सांगितले.

परळीच्या संवेदनशीलतेची व सकारात्मकतेची प्रचिती 

दरम्यान, एकटी तरुणी परळीत आली. दोन दिवस ती मुक्कामीही राहिली. धाडसी प्रवासामुळे आणि बुलेट स्वारी करत एकटीच मुलगी दर्शनासाठी आल्याने ती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. त्यामुळे परळीकरांनी तिचे भरभरून स्वागत करत तिला कौतुकाची थाप दिली. त्याचबरोबर तिचा पाहुणचार करत परळीतील नागरिकांच्या प्रेमाचा व स्वागताचा अनुभव तिला दिला. यामुळे परळीतील लोकांबद्दल अतिशय समाधान व्यक्त करत वारंवार परळीला यायला आपल्याला आवडेल, किती चांगले गाव आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!