ना. पंकजा मुंडे यांच्या झंझावाती नेतृत्वाचा करिश्मा ; सभा घेतलेल्या ठिकाणी भाजपा अव्वल








जनतेने विकासाला कौल दिला - ना. पंकजा मुंडे

मुंबई।दिनांक १६।

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाचा करिश्मा महापालिका निवडणुकीतही दिसून आला. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या होत्या त्याठिकाणी भाजप अव्वल ठरला आहे.


   राज्यातील महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे. प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ना. पंकजाताई मुंडे  व अन्य नेत्याच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सभा घेतलेल्या ठिकाण विजय

ना. पंकजाताई मुंडे हया नांदेडच्या प्रभारी होत्या, याठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रभागात सभा घेतल्या होत्या, तिथे भाजपने बहुमतासह घवघवीत यश संपादन केले. याशिवाय त्यांनी जिथे जिथे सभा घेतल्या त्या पुणे, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर, इचलकरंजी, पनवेल, कल्याण, नाशिक आदी ठिकाणी भाजपने ऐतिहासिक यश संपादन करत महा पालिकेवर झेंडा फडकविला. या यशाबद्दल ना. पंकजाताईंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जनतेने विकासाला कौल दिला

------

या निवडणुकीत भाजपने जोरदार यश मिळवले आहे,  मला खूप आनंद होत आहे. आम्हाला ऐतिहासिक विजय मिळेल हा विश्वास होताच.

जनतेने विकासाला कौल दिला आहे,विजयाचं श्रेय देवाभाऊंना दिलं पाहिजे अशा शब्दांत ना. पंकजाताईंनी निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया दिली.

••••





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!