ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

इमेज
  ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी  तुटपुंजे बिल देत शेतकऱ्यांची फसवणूक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सत्याग्रह आंदोलन सुरूच परळी / प्रतिनिधी...ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिलाची रक्कम, तोडणी मजुरी, वाहतूक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने वारंवार निवेदने, भेटी घेऊन मागील चार महिन्यापासून प्रत्येक वेळी आश्वासनाची पोकळ बोळवण करून वेळ मारून नेत वेळ काढूपणा सुरू असल्याने शुक्रवार दि 8 रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. आंदोलनाची धास्ती घेत जानेवारी महिन्यातील गाळप केलेल्या ऊस देयक पोटी 1800 देय करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरीच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ऊस गळीत हंगाम सुरू होताना ओंकार शुगर्स कडून 2950 रु भाव जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अमिष दाखवत ऊस गाळप सुरू केला. गाळप हंगामापासून ते दि 15 जानेवारी गाळप केलेल्या ऊस देयक पोटी शेतकऱ्यांना 2950 रुपयांनी ऊस देयक ओंकार साखर कारखान्याने अदा केली मात्र तदनंतर गाळप झालेल्या ऊसाची देयके 3 महिन्याचा ...

सर्व स्तरातून अभिनंदन....

अंबाजोगाईच्या मोहित परमार यांच्यावर बीसीसीआयची मोठी जबाबदारी; भारत-न्यूझीलंड सामन्याचे करणार मीडिया नियोजन




अंबाजोगाई (प्रतिनिधी):- येत्या ११ जानेवारी रोजी वडोदरा येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या सामन्याच्या मीडिया नियोजनाची जबाबदारी अंबाजोगाईचे भूमिपुत्र आणि क्रीडा अभ्यासक मोहित परमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या मीडिया नियोजन संघात त्यांची निवड झाल्याने अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मोहित परमार यांना लहान पणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड आहे. त्यांनी २००७ पासून क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. अंबाजोगाईत त्यांनी 'अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी' सुरू करून ग्रामीण भागातील खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य हाती घेतले. त्यांच्या या अकॅडमीतून आतापर्यंत ३९ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे, तर एका महिला खेळाडूने प्रतिष्ठेच्या 'महिला महाराष्ट्र प्रीमिअर लीग'मध्ये (WMPL) स्थान मिळवले आहे. केवळ प्रशिक्षणच नव्हे तर क्रीडा   पत्रकारितेतही परमार यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांना बीसीसीआयचे अधिकृत पत्रकार म्हणून मान्यता मिळाली होती. तसेच ते 'स्पोर्ट्स प्लस' या क्रिकेटला वाहिलेल्या वृत्तपत्राचे काम करतात. त्यांच्या याच अनुभवाची आणि क्रिकेट प्रति असलेल्या निष्ठेची दखल घेत बीसीसीआयने त्यांची निवड मीडिया नियोजन टीममध्ये केली आहे.

             आगामी भारत-न्यूझीलंड सामन्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन आणि नियोजन करण्याची जबाबदारी आता मोहित परमार पार पाडणार आहेत. या निवडीबद्दल क्रिकेट वर्तुळातून आणि विशेषतः अंबाजोगाई करांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....