इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

 हनुमान व्यायाम शाळेत भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन



विद्यार्थी व नागरीकांनी सहभागी व्हावे; दत्ताप्पा ईटके गुरुजी

 

परळी वैजनाथ

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेत शहर व तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन हनुमान व्यायाम शाळेचे जेष्ठ संचालक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

25 जानेवारी हा दिवस जगभरात सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. सूर्यनमस्कार म्हणजे परिपूर्ण व्यायाम असल्याने विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना सुध्दा या व्यायाम प्रकारामुळे आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्यास मदत होते. हनुमान व्यायाम शाळेतर्फे दर वर्षी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो. याही वर्षी हनुमान व्यायाम शाळेत विनामूल्य होणाऱ्या या स्पर्धेत इयत्ता दहावी च्या आतील विद्यार्थ्यांसाठी गट व सर्वसामान्य गट अश्या दोन प्रकारात होणाऱ्या स्पर्धा रविवार दिनांक 25 जानेवारी, सायंकाळी 6.00 वाजता सुरू होणार आहेत.

सुदृढ व निरोगी शरीर राखण्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक असून या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून या स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन हनुमान व्यायाम शाळेचे जेष्ठ संचालक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या