भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा...

 गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या तीन दिवसीय प्रवचन मालेचे माजलगावात आयोजन 




माजलगाव (प्रतिनिधी):-  प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संत धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान माजलगाव आणि राजस्थानी सेवा समाज माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन माजलगाव येथे करण्यात आले आहे.

हे प्रवचन मालेचे 16 वे वर्षे आहे. तर प्रवचनाचा विषय हरिपाठ हा असून या अमृतमय प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान व राजस्थानी सेवा समाज माजलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

 फाल्गुन शुद्ध 1 ते फाल्गुन शुद्ध 3 शके 1947 अर्थात बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 ते शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेमध्ये राजस्थानी मंगल कार्यालय माजलगाव येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ या विषयावर प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार