प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या विस्तारित द्वितीय दालनाचा शुभारंभ

अंतर्मनाची साधनाच माणसाला देवत्व प्राप्त करुन देते- माता स्वामीनी

मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या विस्तारित द्वितीय दालनाचा शुभारंभ

परळी (प्रतिनिधी)

 प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात बाह्य आणि अंतर्मन अशा दोन क्रिया असतात.यातील अंतर्मनाची साधना ही देवत्वाकडे घेवुन जाणारी असल्याचे पुज्य  माता स्वामीनी यांनी केले.परळी शहरातील मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या विस्तारित द्वितीय दालनाचा दि.१० फेब्रुवारी रोजी माताजींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी बोलत होत्या.

 पुज्य स्वामीनी माताजी यांचे सोमवार दि. 9 रोजी सकाळी  ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ नगरीत आगमन झाले आहे.गोपाळ आंधळे यांचे घरणीकर रोड,भाजपा कार्यालयाशेजारी असलेले मुकुंद पुजा विधी साहित्य भांडार हे भाविकांना खात्रीशीर आणि सर्व प्रकारच्या पुजेचे साहित्य मिळणारे दालन म्हणून ओळख निर्माण झाल्यानंतर आता या मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या द्वितीय दालनाचा शुभारंभ वंदनीय पुज्य स्वामीनी माताजी यांच्याहस्ते नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी करण्यात आला.यावेळी गोपाळ आंधळे महाराज,मुकुंद आंधळे व आंधळे परिवाराच्या वतीने माताजींचे पाद्यपुजन करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते रमेश चौंडे,भाजपा युवानेते अश्विन मोगरकर, रामेश्वर महाराज कोकाटे, धनंजय आढाव,महादेव शिंदे,श्रीराम लांडगे,सचिन स्वामी,कैलास शिंदे,किरण स्वामी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या