प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

बीडच्या पोलीस भरतीमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू..

पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या परळीतील मांडेखाेलच्या दीपकवर पोलीस भरतीतच काळाने घातला घाला !


बीडच्या पोलीस भरतीमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
      पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेत बीडच्या पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेल्या परळी तालुक्यातील मांडेखेलच्या दीपक व्हावळे याच्यावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने मांडेखेल गावावर शोककळा पसरली आहे .ऊसतोड मजूर कुटुंबातील या युवकाचे ऐन पोलीस भरती मैदानावरच भरती प्रक्रियेत असताना निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
      बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान बुधवारी दुपारी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक भास्कर व्हावळे (रा. मांडेखेल.ता. परळी, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मांडेखेल येथील रहिवासी आहे. दीपक सकाळी परळीहून बीड येथे पोलीस भरतीसाठी दाखल झाला होता.भरतीदरम्यान कवायत, धावणे आदी शारीरिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.डीहायड्रेशनचा त्रास होत असल्याचे तपासणीदरम्यान सांगण्यात आले. मात्र त्यानंतर काही वेळातच दीपकचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलीस यंत्रणेने तातडीने दीपकला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दीपकचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हृदयविकाराचा तीव्र धक्का त्याला बसला की अन्य काही कारण आहे, याची स्पष्टता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

       दीपकचे आई-वडील ऊसतोड कामगार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मयत युवक दीपक याचे प्राथमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच मांडे केले ते झालेले आहे. उपजीविकेसाठी दीपक पुण्याला काम करत होता. मात्र पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे येऊन पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याचा एक लहान भाऊ असुन तो ऑटो रिक्षा चालवतो. ऊसतोड मजूर असलेल्या या कुटुंबात कुटुंबाचा आधार होण्याची धडपड करणाऱ्या या युवकावर नियतीने अशा पद्धतीने घाला घातल्याने मांडेखेल गावात शोक संवेदना व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मांडेखेल व परळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या