प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतील महापशुधन एक्स्पोत शेतकरी व पशुपालकांनी सहभाग नोंदवावा-उमाताई समशेट्टे

 


परळी (प्रतिनिधी)  

         परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात येत असलेल्या 'महापशुधन एक्स्पो-२०२६' या अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या देशपातळीवरील महापशुधन एक्स्पो-2026 या भव्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून आयोजित करण्यात आले आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या परळी वैद्यनाथ येथील देशपातळीवरील महापशुधन एक्स्पो-2026 या भव्य प्रदर्शनाचा शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संखेने सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपच्या शहराध्यक्षा सौ.उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.

           परळी शहरातील तहसिल समोरील मैदानावर  दि.13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय पशुप्रदर्शन संपन्न होत असून परळी हे पशुप्रदर्शन ३२ एकरांच्या भव्य परिसरात होणार आहे. शेतकऱ्यांना व बेरोजगारांना दूध,मांस,अंडी उत्पादनाची नवीन माहिती मिळावी आणि त्यातून त्यांच्या हाताला काम मिळून त्यांचा आर्थिक विकास ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासंदर्भात मार्गदर्शित ठरणार आहे.या पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.परळीच्या इतिहासात प्रथमच देश पातळीवरील पशुधन महा एक्सपो आयोजित करण्यात आला आहे.या भव्य प्रदर्शनाचा शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संखेने सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपच्या शहराध्यक्षा  सौ.उमाताई चंद्रकांत समशेट्टे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या