इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

पारंपारिक वेशभूषा अन् ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत

भर उन्हात 42 डिग्री तापमानात ना. पंकजाताई मुंडेंचा चंद्रपुरात झंझावात




प्रदूषणमुक्त चंद्रपुरसाठी कटीबध्द; नागरिकांना विश्वास


प्रदूषणाचे निकष न पाळणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाईचे दिले आदेश

चंद्रपूर दि. १६ --

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भर उन्हात ४२ डिग्री तापमानात आज त्यांनी चंद्रपूरमधील प्रदूषणाची पाहणी केली. प्रदूषणाचे निकष न पाळणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना देत असतानाच प्रदूषणमुक्त चंद्रपुरसाठी आपण कटीबध्द असल्याचा विश्वास नागरिकांना दिला.

      ना. पंकजाताई मुंडे यांनी आज चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन आणि दुर्गापूर परिसरातील प्रदूषणाची प्रत्यक्ष ग्राउंड झिरो वर  जाऊन  पाहणी केली. माजी मंत्री तथा भाजपा नेते आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी त्यांच्यासोबत होते. हवेतील उडणारी राख आणि झरपट नदीत मिसळणारे दूषित पाणी याची पाहणी करून प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यवाहीबाबत प्रशासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यांनी कडक सूचना दिल्या.चंद्रपूरकरांना प्रदूषणमुक्त वातावरण मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.

घुग्गुस विदर्भ मिनरल एनर्जी प्रकल्पाला भेट

घुग्गुस येथील कोल वॉशरीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची देखील ना. पंकजाताई मुंडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. ​प्रदूषणाचे निकष पाळले जात नसतील तर अशा प्रकल्पांवर त्वरित कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले.स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण ही आमची प्राथमिकता आहे असे त्या म्हणाल्या.

पारंपारिक वेशभूषा अन् ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत

ना. पंकजाताई मुंडे यांचे शहरात भाजपचे कार्यकर्ते व नागरिकांनी जंगी स्वागत केले.शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात अत्यंत भव्य स्वागत करण्यात आले.सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उत्साही कार्यकर्त्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून, ढोल-ताशांच्या गजरात अत्यंत उत्साहात आणि आपुलकीने स्वागत केले. कार्यकर्त्यांच्या या कल्पकतेने आणि प्रेमाने मन भारावून गेले.​चंद्रपूरच्या मातीतील हा पाहुणचार आणि कार्यकर्त्यांचा हा उत्साह नक्कीच नवी ऊर्जा देणारा आहे. अशा भावना ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळी शोभाताई फडणवीस, अंजली घोटेकर, संगीता खांडेकर,राहुल पावडे यांच्यासह नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या