इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

आजपासून डेमो क्लासेसचा शुभारंभ......

‘कोटा पॅटर्न’ चे सुप्रसिद्ध ‘मोशन एज्युकेशन’ आता परळीत उपलब्ध



परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देशात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कोटा येथील प्रसिद्ध ‘मोशन एज्युकेशन’ आता परळीकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. यामुळे आता इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्सेससाठी घराबाहेर न जाता शहरातच दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांची भक्कम पायाभरणी करण्यासाठी ‘मोशन’ने परळीत पाऊल ठेवले आहे.

       इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यावर येथे भर दिला जाणार आहे. जेणेकरून भविष्यातील NEET, JEE, CA आणि NDA यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील कठीण परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक मानसिकता आणि अभ्यासाची शिस्त निर्माण होईल. कोटाच्या अनुभवी फॅकल्टीचे मार्गदर्शन या कोचिंग सेंटरमध्ये मिळणार आहे. केवळ बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास न घेता, विद्यार्थ्यांची लॉजिकल थिंकिंग (तार्किक विचार), समस्या सोडवण्याची क्षमता आणि वेळेचे नियोजन या कौशल्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. कोटा येथील अनुभवी शिक्षकांद्वारे तयार केलेली टेस्ट सिरीज, शंका निरसन सत्र आणि करिअर कौन्सेलिंग ही या केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.

आजपासून डेमो क्लासेसचा शुभारंभ

       परळीतील पालकांना आणि विद्यार्थ्यांना या दर्जेदार शिक्षणाचा अनुभव घेता यावा, यासाठी आजपासून दुपारी ४:०० वाजता विद्यानिकेतन स्कूल योगेश गार्डन परळी वैजनाथ येथे मोफत ‘डेमो क्लासेस’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेचे स्वप्न पाहणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या